Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कप वादानंतर पाकिस्तानची नमती भूमिका! हॉकी विश्वचषकासाठी भारतातील मैदानात खेळणार

पाकिस्तानकडून आशिया कप वादानंतर नरमाईची भूमिका घेत भारतात खेळवण्यात येणाऱ्या FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकात खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ भारतात येणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 30, 2025 | 05:08 PM
Pakistan's humble stance after Asia Cup controversy! Indian players to play in Hockey World Cup

Pakistan's humble stance after Asia Cup controversy! Indian players to play in Hockey World Cup

Follow Us
Close
Follow Us:

FIH Junior Hockey World Cup 2025 : अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवत  लष्करी कारवाई करत पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. या संबंधांचा परिणाम हा क्रीडा क्षेत्रावर झालेला दिसून येत आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान हॉकी संघाने आशिया कपसाठी भारतात येण्यास नकार दर्शवला होता.  परंतु आता पाकिस्तानच्या हॉकी संघाने FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या  पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक! भारताचे पदक पक्के 

पाकिस्तानी संघ भारतात खेळणार

भारतात होणाऱ्या FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय पाकिस्तानकडून घेण्यात आला आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी याबाबत माहीत देत सांगितले की, “पाकिस्तानने या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकात आपला सहभाग निश्चित केला आहे.” FIH ज्युनियर हॉकी विश्वचषक हा हॉकीच्या जगातला एक प्रतिष्ठित कार्यक्रम मानला जातो. या स्पर्धेत जगभरातील २१ वर्षांखालील संघ आपला सहभाग नोंदवबत असतात. या स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध करून देते. तसेच भविष्यातील स्टार्सना उदयास यायला या स्पर्धेमुळे मदत होते. भारत यावेळी FIH ज्युनियर हॉकी विश्वचषका स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

‘या’ कालावधीत पार पडणार स्पर्धा

FIH ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप २०२५ या वर्षी भारतात आयोजित करण्यता आला आहे. हा विश्वचषक २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये एकूण २४ संघ सहभागी होणार आहे. भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह, चिली आणि स्वित्झर्लंडसह पूल ब  गटात आहेत. जर्मनी हा गत ज्युनियर पुरुष विश्वविजेता संघ असून २०२३ च्या आवृत्तीच्या अंतिम फेरीमध्ये फ्रान्सचा २-१ असा पराभव करून विक्रमी सातवे विजेतेपद आपल्या नावावर केले.

हेही वाचा : US Open 2025 : नोवाक जोकोविचने रचला इतिहास! ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश

आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाचा नकार

भारतातील बिहारमधील राजगीर हॉकी आशिया कप २०२५ खेळवण्यात येत आहे. परंतु, पाकिस्तान संघाने आशिया कपपूर्वी भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान आशिया कप संघात सहभागी झालेला नाही. सुरक्षेच्या कारण पुढे करून पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला होता. परंतु आता पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून FIH ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपसाठी संघ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Pakistan to come to india to play in fih junior hockey world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 05:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.