सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी(फोटो-सोशल मीडिया)
BWF World Championships 2025 : सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF मध्ये भारताची मान उंचावली याहे. देशाच्या खात्यावर अद्याप एकाही पदकाची कमाई झालेली नसली तरी या दोघांनीही येथे भारतासाठी पदक निश्चित करण्यात आले आहे. खरं तर, सात्विक आणि चिरागने दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांना क्वार्टर फायनलमध्ये पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
सात्विक आणि चिरागने ४३ मिनिटे चाललेल्या सामन्यामध्ये मलेशियन जोडीचा २१-१२, २१-१९ असा धुव्वा उडवला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय जोडीचे हे दुसरे पदक असणार आहे. मागील वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्याच कोर्टवर भारतीय जोडीला मलेशियन जोडीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. विजयानंतर प्रतिक्रिया देताना चिराग शेट्टी म्हणाला की, “खूप छान वाटत आहे. हा ऑलिंपिकचा रीमॅच होता आणि मला वाटत आहे की, आम्हाला शेवटी बदला मिळाला आहे. यावेळी तोच कोर्ट, तोच स्टेज होता.”असे चिराग म्हणाला.
हेही वाचा : DPL 2025 : सामन्यात झालेल्या वादानंतर नितीश राणा – दिग्वेश राठीसह 5 खेळाडूंना सुनावली शिक्षा
चिराग शेट्टी पुढे म्हणाला की, “अगदी एक वर्षापूर्वी. ऑलिंपिक आणि आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. त्यांच्याविरुद्ध खेळताना नेहमीच चांगले वाटत आले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला नेहमीच कठीण आव्हान मिळाले आहेत. आम्हाला या वेळी जिंकून खूप आनंद झाला आहे.” रंकारेड्डीकडून अंतिम चारमध्ये स्थान मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तो म्हणाला, “दुसऱ्या गेममध्ये, जेव्हा आम्ही आघाडीवर असतानाच आम्हाला खात्री झाली होती की आम्ही, सहजासहजी जिंकणार नाही. ते नक्कीच खेळात जोरदार पुनरागमन करतील. कारण आम्ही अनेक वेळा खेळलो आहोत.”
रेड्डी म्हणाला की, “जेव्हा आम्ही गेम जिंकलो तेव्हा सामना खूप कठीण होता, परंतु आम्हाला केवळ आमचा सर्वोत्तम खेळ खेळायचा होता. आमचे संपूर्ण लक्ष आमच्या खेळावर केंद्रित करणे इतकेच होते. आज आम्ही ज्या पद्धतीने खेळलो आणि जिंकलो त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे.”
हेही वाचा : ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’, कानशिलात मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर श्रीशांतची पत्नी संतापली
शनिवारी खेळवण्यात आलेल्या चीनच्या ११ व्या मानांकित चेन बो यांग आणि लिऊ यी विरुद्धच्या उपांत्य फेरी सामन्यात शेट्टी म्हणाला की, तो स्पर्धेतील इतर कोणत्याही सामन्याप्रमाणे हा सामना खेळला. शेट्टी म्हणाला, “आमचे लक्ष नेहमीच एका सामन्यावर केंद्रित असते. चिनी जोडी चांगली आणि खूप मजबूत आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध यापूर्वी खेळलेलो आहोत. सामन्याची उत्सुकता आहे.”