
Pakistani kabaddi player's troubles increase! PKF to impose strict punishment for playing with the Indian team.
Action will be taken against Ubaidullah Rajput : पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूतच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यावर भारतीय संघाकडून खेळल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आता पाकिस्तान कबड्डी फेडरेशन (PKF) सक्रिय झाले आहे. त्यामुळे आता त्याच्याविरोधात कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रकरणावर अंतिम निर्णय डिसेंबरअखेर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१६ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये झालेल्या GCC कप या खासगी कबड्डी स्पर्धेत उबैदुल्लाह राजपूतने सहभाग घेतला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने भारतीय संघाकडून सामना खेळला.इतकेच नाही तर, त्याने भारतीय जर्सी घालून भारतीय ध्वज देखील फडकावला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती आणि मोठा वाद देखील निर्माण झाला. आता पाकिस्तान फेडरेशनकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पाकिस्तान कबड्डी बोर्ड त्यांचा स्टार खेळाडू उबैदुल्लाह राजपूतविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या तेरीत असल्याची माहिती समोर आली आहे. उबैदुल्लाह बहरीनच्या राष्ट्रीय दिनी आयोजित करण्यात आलेलेल्या एका खाजगी स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाकडून खेळताना दिसून आला होता. त्याने भारतीय जर्सी देखील घातलेली दिसत होती आणि त्याने तिरंगा देखील फडकावला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला होता.
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनचे सचिव राणा सरवर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “या विषयावर चर्चा करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी फेडरेशनची आपत्कालीन बैठक बोलावली गेली आहे. त्यावेळी राजपूत आणि इतर अनेक खेळाडूंविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.” सरवर म्हणाले की, “मी असे म्हणू शकतो की ही एक खाजगी स्पर्धा होती, ज्यामध्ये आयोजकांनी भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि इराण नावाचे खाजगी संघ तयार करण्यात आले होते.” ते पुढे म्हणाले की , “सर्व संघांमध्ये त्यांच्या संबंधित देशांचे खेळाडू होते. भारतीय खेळाडूंकडून भारतीय खाजगी संघाचे प्रतिनिधित्व करण्यात आले आणि उबैदुल्लाह त्यांच्याकडून खेळला, जे या परिस्थितीत अस्वीकार्य असेच आहे.”
उबैदुल्ला हा परवानगीविना गेल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात येइल. पीकेएफ सचिव सरवर यांनी म्हटले की, “१६ पाकिस्तानी खेळाडूंनी फेडरेशन किंवा पाकिस्तान क्रीडा मंडळाच्या परवानगीविना बहरीनचा प्रवास केला. पाकिस्तान संघाच्या नावाने चुकीच्या पद्धतीने खेळल्याबद्दल या खेळाडूंवर देखील कारवाई करण्यात येईल.”
उबैदुल्लने माफी मागितली की, राजपूत यांनी माफी मागितली आहे आणि त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, बहरीनमधील स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रित केले गेले होते आणि त्यांचा एका खाजगी संघात समावेश करण्यात आला होता. तो म्हणाला की , “मला नंतर कळले की त्यांनी संघाचे नाव ‘भारतीय संघ’ असे ठेवले आहे. मी आयोजकांना भारत आणि पाकिस्तानची नावे वापरू नका असे सांगितले.”