Nitesh Kumar Wins Gold Medal Badminton Paralympics 2024
Nitesh Kumar Wins Gold Medal Badminton Paralympics 2024 : नितेश पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवून इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो आता फक्त तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकून, नितीश कुमार यांनी पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला एकूण नववे पदक जोडले आहे.
रोमांचक सामन्यात नितेशची प्रयत्नांची पराकाष्ठा
Congratulations to @niteshnk11 for his outstanding performance in the Para Badminton Men's Singles SL3 at the #Paralympics2024, winning the GOLD!
Your exceptional talent & commitment have brought pride to every Indian.
The nation stands tall in celebration of your success!… pic.twitter.com/PpLFGTPoHl— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 2, 2024
रोमांचक सामन्यात नितेशची दमदार खेळी
नितेश कुमारने सुरुवातीपासूनच सामन्याची सूत्रे आपल्या हातात ठेवल्याचे पाहायला मिळत होते. पहिला राऊंड त्याने सहज जिंकला परंतु, दुसऱ्या राऊंडमध्ये ब्रिटीश खेळाडू डॅनियलने जोरदार कमबॅक करीत दुसरा राऊंड जिंकला. तिसरा राऊंड अर्थातच निर्णायक होता, यामध्ये दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, अखेरच्या क्षणी नितेशने धमाकेदार खेळ दाखवता मॅच विनिंग पाॅईंट घेत सामना खिशात टाकला.
नितेशकुमारची सुवर्णभरारी
Nitesh nails it!! Second #Gold🥇for India at #ParisParalympics2024😍🥳
The 29-year-old becomes the third para shuttler in the Men’s Singles SL3 category to win a medal for #TeamIndia, and he did so without losing a single match 🤯at #Paris2024.
5 matches. 5 wins ✅
In the… pic.twitter.com/eGBRfoigHd
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
भारताच्या झोळीत नववे पदक
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 9 पदके जिंकली आहेत. सध्याच्या गेम्समध्ये नितीश कुमार हे बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू ठरले आहेत. नेमबाजीत आतापर्यंत 4 पदके जिंकली आहेत. अवनी लेखराने सुवर्ण, मनीष नरवालने रौप्य, मोना अग्रवाल आणि रुबिना फ्रान्सिसने कांस्यपदकावर लक्ष्य ठेवले आहे. ॲथलेटिक्समध्येही देशाला 4 पदके मिळाली आहेत. निषाद कुमारने उंच उडीत रौप्य, योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्यपदक, तर प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
बॅडमिंटनमध्ये आणखी 2 पदकांची अपेक्षा
नितेश कुमार व्यतिरिक्त जर आपण पुरुष एकेरी स्पर्धेबद्दल बोललो तर भारताला अजून 2 पदके मिळू शकतात. सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL4 प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे, म्हणजेच त्याचे रौप्य पदक निश्चित आहे. या प्रकारात सुकांत कदम कांस्यपदकाच्या लढतीत सहभागी होणार आहे. गेल्या वेळी भारताला बॅडमिंटनमध्ये केवळ एकच पदक जिंकता आले होते, पण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील पदकांची संख्या ५ च्या वर जाऊ शकते.