Paralympic defending gold medalist Sumit Antil has also won the gold medal in Paris
Paralympics Games 2024 : दोन वेळचा विश्वविजेता आणि गतविजेता पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल याने यावेळीसुद्धा पॅरिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या सुनीलने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या F64 प्रकारात पॅरालिम्पिक विक्रम केला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ७०.५९ मीटर होता. हा देखील एक पॅरालिम्पिक विक्रम आहे. याआधीही पॅरालिम्पिकचा विक्रम सुमितच्या नावावर होता. त्याने टोकियोमध्ये ६८.५५ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत F64 सोबत F44 आणि F42 खेळाडू सहभागी होतात.
सुमित अंतिलची सुवर्ण कामगिरी
Sumit Antil strikes Gold yet again with a Paralympic Record!🇮🇳🥇#Paris2024 #Paralympics #SKIndianSports #Athletics pic.twitter.com/FoMd2duElz
— Sportskeeda (@Sportskeeda) September 2, 2024
सुमितची दुसरी थ्रो सर्वोत्तम ठरली
पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारताचा पुरुष ध्वजवाहक असलेल्या सुमित अंतिलने पहिल्याच प्रयत्नात 69.11 मीटर अंतर कापून पॅरालिम्पिक विक्रम मोडला. हरियाणाच्या 26 वर्षीय पॅरा-भालाफेक स्टारने त्याच्या पुढच्याच थ्रोमध्ये आपला विक्रम सुधारला आणि या स्पर्धेत 70 मीटरचा टप्पा ओलांडणारा तो पॅरालिम्पिक इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. तिसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात 1 मीटरचे अंतर कापले, तर चौथ्या थ्रोमध्ये फाऊल झाला. त्याचा शेवटचा प्रयत्न ६६.५७ मीटर होता.
संदीपचे पदक जिंकणे हुकले
या स्पर्धेत भारताला दोन पदके जिंकण्याची संधी होती पण संदीपने ती गमावली. ज्यामध्ये संदीपने तिसऱ्या प्रयत्नात 62.80 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून स्पर्धेत चौथे स्थान मिळविले. या स्पर्धेत भाग घेणारा संदीप संजय सरगर हा तिसरा भारतीय होता आणि त्याने ५८.०३ मीटरची सर्वोत्तम थ्रो करून सातवे स्थान पटकावले. श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवाक्कूने 67.03 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल बुरियनने 64.89 मीटरसह कांस्यपदक जिंकले.
भारताच्या खात्यात 14 पदके
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तीन सुवर्णांसह एकूण 14 पदके आहेत. यामध्ये तीन सुवर्ण तसेच 5 रौप्य आणि 14 कांस्य पदके आहेत. टोकियोमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. पदकतालिकेत भारत सध्या १४व्या स्थानावर आहे.