Spain football team win Gold
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये स्पेन फुटबॉल संघाने यजमान फ्रान्सचा 5-3 अशा फरकाने पराभव करीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. दोन्ही संघांमधील हा सुवर्णपदकासाठीचा सामना अतिरिक्त वेळेत संपला. फ्रान्सने 3-1 अशा पिछाडीवरून जोरदार पुनरागमन केले आणि सामना अतिरिक्त वेळेत नेण्यात यश मिळविले, परंतु अखेरीस स्पेनने बाजी मारली. अशा प्रकारे अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 8 गोल केले. हा तोच स्पेन आहे ज्याला भारताने हॉकीमध्ये कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत केले होते.
स्पेनने रचला इतिहास
🎉⚽️ 𝗙𝗨𝗟𝗟 𝗧𝗜𝗠𝗘!! Spain take the win! The Spanish Men's Olympic Team win 𝑮𝑶𝑳𝑫🥇 at #Paris2024.
Great EFFORT, great VICTORY, a HISTORIC DAY!
🇫🇷 3-5 🇪🇸#UnSueñoCompartido pic.twitter.com/a6XhxT4nC8
— Spanish Football (@SpainIsFootball) August 9, 2024
हाफ टाईमनंतर फ्रेंच संघाची जोरदार आगमन
या सामन्यात यजमान फ्रान्सने पहिला गोल केला होता, पण लवकरच स्पेनने दोन गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. हाफ टाईमनंतर फ्रेंच संघानेही शानदार पुनरागमन करत स्कोअर बरोबरीत आणला, मात्र स्पेनचा बदली खेळाडू सर्जिओ कॅमेलो याने अतिरिक्त वेळेत दोन गोल करत स्पेनला विजय मिळवून दिला.
ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यात स्पॅनिश संघ यशस्वी
1992 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यात स्पॅनिश संघ यशस्वी ठरला. याआधी, केवळ महिनाभरापूर्वी त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली होती, ज्यामध्ये त्यांनी इंग्लंडचा पराभव केला होता. याशिवाय स्पेनच्या १९ वर्षांखालील पुरुष संघानेही युरोपियन विजेतेपद पटकावले असून महिला संघाने गेल्या वर्षी विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे फ्रान्सच्या संघाने सुरुवातीला निराशा केली, पण नंतर रौप्यपदक जिंकून आनंद साजरा केला. फ्रान्सचे प्रशिक्षक थियरी हेन्री यांनी सांगितले की, संघ तयार करण्यात अडचणी आल्या, परंतु त्यांना आपल्या संघाचा अभिमान आहे.
फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील हा अंतिम फुटबॉल सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. या सामन्यासाठी सुमारे 48 हजार प्रेक्षक आले होते, मात्र घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही फ्रान्सला दुसऱ्या क्रमांकावर राहून रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.