फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट
आज ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) भव्यदिव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यासाठी भारताचे ११७ खेळाडू सज्ज झाले आहेत. भारताकडून पीव्ही सिंधू आणि टेनिसपटू शरद कमल यांच्या हातात ध्वजवाहक असणार आहे. भारतीय वेळेनुसार या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग रात्री ११ वाजता सुरु होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३० हा सोहळा रंगणार आहे. भारताची मोहीम २५ जुलै रोजी सुरु झाली आहे. या पहिल्याच दिवशी भारताच्या तिरंदाजानी दमदार सुरुवात केली आहे. भारताचे महिला आणि पुरुष तिरंदाज संघ थेट उपांत्य पूर्व फेरीमध्ये पोहोचले आहेत. यंदाचा उद्घाटन सोहळा हा स्टेडियममध्ये न होता सिन नदीवर आयोजित करण्यात आला आहे.
असे सांगण्यात येत आहे की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आयोजित करण्यात आलेला हा उद्घाटन सोहळा इतिहासातील सर्वात मोठा उद्घाटन समारंभ असणार आहे. या सोहळ्याला अनेक स्टार उपस्थित असणार आहेत असे अंदाज लावले जात आहेत. यामध्ये लेडी गागाचे नाव पुढे येत आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात दिसू शकते. मात्र, या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या बहुतांश स्टार्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, लेडी गागा व्यतिरिक्त प्रसिद्ध गायिका सेलीन डीओनचा परफॉर्मन्स देखील पाहता येईल. सेलीन डिऑन आणि लेडी गागा पॅरिसमध्ये दिसल्या.
ऑलिम्पिकच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल की उद्घाटन सोहळा कोणत्याही स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार नाही. हा उद्घाटन सोहळा सीन नदीवर होणार आहे. खेळाडू अनेकदा आपल्या देशाचा ध्वज घेऊन मैदानावर फिरवताना दिसणार आहेत.
भारतीय वेळेनुसार हा उद्घाटन सोहळा रात्री ११ वाजता सुरु होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रेक्षकांना स्पोर्ट्स18 च्या माध्यमातून भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केले जाणार आहे. तर याशिवाय उद्घाटन समारंभाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर केले जाईल. तुम्ही मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यास सक्षम असाल.