
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताच्या पॅरा खेळाडू साध्य पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत आहेत. आज पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा सहावा दिवस आहे. भारताने पॅरालिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवशी ८ मेडलची कमाई केली आहे. यामध्ये आतापर्यत २ सुवर्ण, ३ रौम्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. मेडल टॅली मध्ये भारत सध्या १५ व्या स्थानावर आहे. आतापर्यत भारताने १५ मेडल खात्यामध्ये जमा केले आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ५ रौम्य आणि ७ कास्यपदकांचा समावेश आहे.
काल पॅरा बॅडमिंटनचे इव्हेंट्स संपले आहेत. आणखी पाच दिवस पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु असणार आहे. आज भारताचे काही दमदार ॲथलेटिक्स मेडलसाठी लढणार आहेत. आज भारतीय प्रेक्षकांची नजर पॅरा ॲथलेटिक्सवर असणार आहे, दिवसभरामध्ये ५-६ मेडल अपेक्षित आहेत. त्यामुळे आज किती मेडल भारतीय खेळाडूंच्या हाती लागतात याकडे प्रेक्षकांची नजर असणार आहे.
हेदेखील वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चॅम्पियन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा! पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारतासाठी सुवर्ण दिवस