फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताच्या खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेमधील सर्वाधिक मेडल मिळवण्याचा नवा विक्रम रचला आहे. २ सप्टेंबरचा हा दिवस भारतीय खेळासाठी ऐतिहासिक दिन आहे. भारताच्या खेळाडूं अद्भुत कामगिरी करून आठ मेडल नावावर केले आहेत, यामध्ये २ सुवर्णपदक, ३ रौम्य आणि ३ कास्यपदकांचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या ५ पॅरा बॅडमिंटनपटूंनी पदक नावावर केले आहे. भारताने सर्वाधिक १९ मेडल टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये मिळवले होते. आता पाचव्या दिवसांमध्ये भारताच्या खात्यात १५ मेडल जमा झाले आहेत. याचा आनंद सध्या संपूर्ण भारत साजरा करत आहे, मेडल जिंकल्यानंतर सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चॅम्पियन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत, काय म्हणाले नरेंद्र यावर नजर टाका.
योगेश कथुनियाने दुसऱ्यांदा मेडल नावावर केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X अकाउंटवर लिहिले की, @योगेशकथुनियाचे अभिनंदन, #Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 मध्ये रौप्य पदक जिंकून भारताला अभिमान वाटावा यासाठी! दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि लवचिकतेचा त्यांचा एक अविश्वसनीय प्रवास आहे. त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा.
Congrats to @YogeshKathuniya for making India proud by winning the Silver medal in the Men’s Discus Throw F56 at the #Paralympics2024! His is an incredible journey of determination, hard work and resilience. Best wishes for his upcoming endeavours. #Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2024
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू नितेश कुमारने सुवर्णपदक जिंकले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले की, नितेश कुमारने पॅरा बॅडमिंटन पुरूष एकेरी SL3 मध्ये सुवर्णपदक जिंकून केलेली एक जबरदस्त कामगिरी! तो त्याच्या अविश्वसनीय कौशल्य आणि चिकाटीसाठी ओळखला जातो. तो आगामी क्रीडापटूंना प्रोत्साहन देत राहतो. @niteshnk11
A tremendous achievement by Nitesh Kumar in the Para Badminton Men’s Singles SL3, as he wins the Gold! He is known for his incredible skills and perseverance. May he keep motivating upcoming athletes. @niteshnk11#Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2024
भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकले आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सुमितची अप्रतिम कामगिरी! पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन! त्याने सातत्याने खेळ समाजने आणि उत्कृष्टतेने कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. @sumit_javelin
Exceptional performance by Sumit! Congratulations to him for winning the Gold in the Men’s Javelin F64 event! He has shown outstanding consistency and excellence. Best wishes for his upcoming endeavours. @sumit_javelin#Cheer4Bharat pic.twitter.com/1c8nBAwl4q
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2024