
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ग्लड विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तनाचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्याचा पहिला सामना झाला आणि त्यांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिका झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामान्यांची मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा एक क्रिकेट विश्वातील मजबूत संघ मानला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा हटके फलंदाज स्टिव्ह स्मिथ संघामध्ये पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश हॅझलवूड यांसारख्या दमदार खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजाबद्दल बोलायचं झालं तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा हे त्यांची कमाल तर मैदानात दाखवतातच. ॲरॉन हार्डी, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मॅथ्यू शॉर्ट यांना सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे. शॉन ॲबॉट, कूपर कोनोली या नव्या खेळाडूंना सुद्धा संघामध्ये जागा मिळाली आहे.
मार्श आणि हेड हे दोघेही संघामध्ये कमालीची कामगिरी करत आहेत परंतु त्यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागेवर जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅट शॉर्ट यांच्यासाठी संघाचा दरवाजा उघडण्यात आला आहे. तर कॅमरन ग्रीन सध्या त्याच्या दुखापतींशी झुंज देत आहे, या आठवड्यामध्ये त्याच्यावर शास्त्रकिया केली जाणार आहे.
Our ODI squad to take on Pakistan next month is locked 🔒 pic.twitter.com/5ny05yP5gS — Cricket Australia (@CricketAus) October 14, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना या मालिकेचा ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा सामना ८ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर शेवटचा तिसरा सामना १० नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, कूपर कोनोली, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा