Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs PBKS: पंजाबच्या ‘सरदारांची’ तुफान फटकेबाजी; हैद्राबादच्या ‘नवाबां’ना दिले 246 धावांचे विशाल लक्ष्य

कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ 36  चेंडूत 82 धावा केल्या. पंजाबकडून सर्वात जास्त धावा या श्रेयस अय्यरने केल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 12, 2025 | 09:58 PM
SRH Vs PBKS: पंजाबच्या ‘सरदारांची’ तुफान फटकेबाजी; हैद्राबादच्या ‘नवाबां’ना दिले 246 धावांचे विशाल लक्ष्य
Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025: आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या फलंदाजांनी हा निर्णय एकदम योग्य ठरवला. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये तुफान फलंदाजी करत 245 धावा फटकावल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ 36  चेंडूत 82 धावा केल्या. पंजाबकडून सर्वात जास्त धावा या श्रेयस अय्यरने केल्या. त्या शिवाय प्रभसीमरनने 42 टर प्रियांशने 36 धावा केल्या.

𝘛𝘩𝘢𝘵'𝘴 𝘴𝘰𝘮𝘦 𝘚𝘩𝘳𝘦𝘺𝘢𝘴 𝘚𝘩𝘰𝘸 🫡

Shreyas Iyer leading #PBKS with intent as he races to his faster #TATAIPL half-century in just 22 balls 💪

PBKS are 160/2 after 13 overs.

Updates ▶ https://t.co/RTe7RlYbGY #TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/DP43BCC4uF

— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025

यंदाच्या हंगामात हैदराबादने सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. त्यानंतर आज पंजाबच्या संघाने सर्वोच्च अशी दुसरी धावसंख्या उभारली आहे. पंजाबने आज दोन विक्रम रचले आहेत. हैदराबाद संघाचे गोलंदाजांची आज चांगलीच धुलाई झाली. मोहम्मद शमीने सर्वाधिक धावा दिल्या.

पंजाब किंग्जच्या फलंदाजांची बल्ले-बल्ले

पंजाबच्या ओपनर्सने हा निर्णय योग्य ठरवला. आणि यंदाच्या हंगामातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा दूसरा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चालू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर नोंदवला. श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या पंजाबने पॉवरप्लेमध्ये दूसरी सर्वोच्च धावसंख्या केली आहे. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 6 ओव्हर्समध्ये 89 धावा केल्या. या धावा करताना पंजाबने एक गडी गमावला.

आजच्या सामन्यातील बदल

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कमिंडू मेंडिसने संघासाठी काही विशेष कामगिरी केली नाही त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागेवर इशान मलिंगाला संघामध्ये स्थान मिळाले. पंजाब किंग्सच्या संघाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. पंजाब किंग्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज पंजाबच्या फलंदाजीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

पंजाब किंग्सचा या वर्षी कर्णधार बदलला आहे. संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कमालीची फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक देखील बदलले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आतापर्यत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ विजय मिळवले आहेत आणि १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचा संघ कागदावर मजबूत दिसत होता पण त्यांनी चाहत्यांना प्रचंड निराश केले आहे. संघाने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त पहिल्या राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे त्यानंतर सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पंजाब किंग्सची प्लेइंग ११ :

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग ११ :

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा.

Web Title: Pbks set 246 target for sunrisers hyderabad in todays ipl 2025 sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 09:36 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Punjab Kings
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.