BCCI makes big changes in selection committee! Pragyan Ojha and RP Singh given big responsibility
Pragyan Ojha-RP Singh join senior men’s selection panel : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत पार पडली. माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच आता माजी भारतीय खेळाडू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांच्यावर देखील बीसीसीआयने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा पुरुष निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला, तर तामिळनाडूचे माजी फलंदाज एस. शरथ ज्युनियर निवड समितीमध्ये पुन्हा परतले आहेत. अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा : वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमच्या घरी चोरी! सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला खळबळजनक खुलासा
एजीएममध्ये, अमिता शर्मा यांनी आता नीतू डेव्हिड यांची जागा घेतली आहे. ११६ एकदिवसीय सामने खेळलेल्या माजी भारतीय वेगवान गोलंदाजासोबत श्यामा डे, जया शर्मा आणि श्रावंती नायडू हे सदस्य असणार आहेत. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर सुरू होणार आहे.
एस. शरथ आणि सुब्रतो बॅनर्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग हे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरुष निवड समितीत दाखल झाले आहेत. शिवसुंदर दास आणि अजय रात्रा हे देखील समितीचे इतर सदस्य आहेत. प्रज्ञान ओझाने २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामन्यांमध्ये भारतासाठी प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने एकूण १४४ विकेट्स घेतल्या आहेत.
आरपी सिंगने भारताकडून १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण १२४ विकेट्स घेतल्या आहेत. वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार आणि अमय खुरासिया, आशिष विन्स्टन झैदी आणि शक्ती सिंग हे देखील अर्जदारांमध्ये समाविष्ट होते.
एजीएम दरम्यान दिल्लीचे माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी पदभार सोडणाऱ्या रॉजर बिन्नी यांची जागा घेतली आहे. मनहास हे बीसीसीआयचे ३७ वे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरमधील हे पद भूषवणारे पहिलेच व्यक्ति ठरले आहेत.
मिथुन मनहास यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अंदाजे ९,७१४ धावा फटकावल्या आहेत. मिथुन मनहास यांनी जवळजवळ दोन दशके देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. या काळात ते दिल्ली संघाचा भाग राहिले होते, ज्यामध्ये विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, आकाश चोप्रा, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांसारखे प्रमुख खेळाडू होते.