मेरी कोम(फोटो-सोशल मीडिया)
Theft at Mary Kom’s house : भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमच्या फरिदाबाद येथील घरी चोरी झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरीच्या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला असून माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल जाहले आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून मेरी कोमच्या घराची सुरक्षा व्यवस्था आणि संभाव्य चोरांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण चोरीचा उलगडा करण्यासाठी आणि या चोरीला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून प्रकरणाचा तपास देखील करण्यात येत आहे. मेरी कोमच्या घरी झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे, ज्यामध्ये ६-७ लोक घरातून वस्तू चोरताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांकडून लवकरच प्रकरण सोडवण्याचा दावा करण्यात आला आहे.
मेरी कोम गेल्या तीन वर्षांपासून फरिदाबादच्या सेक्टर ४६ मधील घर क्रमांक ३०० मध्ये वास्तव्य करत आहे. शेजाऱ्यांच्या मते, ती गेल्या दोन आठवड्यांपासून घराबाहेर दूर आहे. ती एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मेघालयला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. २४ तारखेला सकाळी ही चोरीची घटना घडली आहे. २६ तारखेला सीसीटीव्ही फुटेज तपसल्यानंतर शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा ते सात जण मेरी कोमच्या घरात एक घुसून वस्तू चोरून पळून जाताना स्पष्ट दिसू आले आहेत. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि मेरी कोमला याबाबत माहिती दिली.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक विभागाचे पथक आणि स्थानिक पोलिस उपस्थित होते आणि त्यांनी या प्रकरणाचा आता तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
तथापि, घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. पोलिस याबाबत तपास करत आहेत आणि मेरी कोमच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. तिच्या परतल्यानंतरच घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या याबाबत कळू शकेल.