Buchi Babu Trophy 2025: Prithvi Shaw hits a powerful century; knocks on doors to return to the Indian team
Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉ हा आपल्या वादग्रस्त शैलीने गेले काही वर्ष झाली चर्चेत असणारा आणि ज्याच्या करियर आता संपले असे बोलले जात होते. पण आता या खेळाडूने असे काही करून दाखवले की आता त्याचे सर्वजण मोठं कौतुक करताना दिसत आहे. पृथ्वी शॉने बुची बाबू ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी दमदार शतक झळकवले. शॉने पहिल्यांदाच महाराष्ट्र संघासाठी एक सामना खेळला असून त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच शतकाला गवसणी घातली आहे. शॉने छत्तीसगडविरुद्ध १११ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत शॉने १४१ चेंडूचा सामना करत आणि ७८ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने १५ चौकार आणि एक षटकार लागवला आहे. या खेळने त्याने बीसीसीआयला त्याने एक इशारच दिला आहे.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : पूर्व विभागाला झटका! कर्णधार इशान किशनसह आकाश दीप स्पर्धेबाहेर; ईश्वरनकडे संघाची धुरा
पृथ्वी शॉची ही खेळी खास ठरत आहे. कारण त्याच्या कठीण काळ सुरू असून तो भारतीय संघात पुनरागंमन करण्याची तयारी करत आहे. महाराष्ट्र संघाचे फलंदाज पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळत होते. शॉने आक्रमक फलंदाजी करून विरोधी गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले आहे. महाराष्ट्राने फक्त ८६ धावांत आपले ४ गडी गमावले होते, पाच टॉप ऑर्डर फलंदाजांपैकी ४ फलंदाज फक्त १०, ४, १ आणि ० इटक्याच धावा करू शकले. ऋतुराज गायकवाडला देखील काही खास करता आलेले नाही. तो फक्त ४ धावा करून माघारी परतला. मात्र, एका बाजूने शॉने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याच्या खेळीने महाराष्ट्राला सामन्यात जीवंत ठेवण्यास मदत केली. शॉ माघारी परतला तेव्हा महाराष्ट्राचा स्कोअर १६६ धावा होता आणि त्यात त्याचे योगदान १११ धावांचे होते.
पृथ्वी शॉने अलीकडेच मुंबईच्या स्थानिक संघातून बाहेर पडला आहे. खराब तंदुरुस्तीमुळे त्याला रणजी ट्रॉफीमधून वगळण्यात आले होते. त्यानंतर शॉने मोठा निर्णय घेत महाराष्ट्र संघात सामील झाला. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात शतक ठोकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. पृथ्वी शॉला भारतीय संघात परतायचे आहे. या खेळीने तो निवडकर्त्यांच्या नजरा नक्कीच त्याच्याकडे वळवण्यात यशस्वी होऊ शकतो.