आकाश दीप आणि ईशान किशन(फोटो-सोशल मीडिया)
Duleep Trophy 2025 : भारत इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यात भारताने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले होते. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय संघाला दुरखापतींनी घेरले होते. या मालिकेत ऋषभ पंतल दुखापत झाली होती. तसेच या मालिकेत ३ सामने खेळणाराय आकाशदीपच्या पाठीचे देखील दुखणे वाढले होते. आता अशातच दुखापतीतून न सावरल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि कर्णधार यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन उत्तर विभागाविरुद्धच्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. अंत संघाचे नेतृत्व ईश्वरनकडे देण्यात आले आहे. भारतीय देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा, दुलीप ट्रॉफी, २८ ऑगस्टपासून बंगळुरू येथील बीसीसीआय ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मैदानावर खेळवली जाईल.
हेही वाचा : कार्लोस अल्काराजने रचला इतिहास! पहिल्यांदाच Cincinnati Open च्या विजेतेपदावर कोरले नाव
अलिकडच्या इंग्लंड दौऱ्यात पाचपैकी तीन कसोटी सामने खेळणारा आकाश दीप अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. २८ वर्षीय गोलंदाजाची जागा पूर्व विभागाच्या संघात बिहारच्या मुख्तार हुसेनने घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत १० बळींसह मालिकेत १३ बळी घेणारा बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशने प्रादेशिक निवड समितीला सांगितले आहे की, वैद्यकीय सल्ल्यानुसार तो या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही.
२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, किशन देखील त्याच्या हाताच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. किशनच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, ई-बाईकवरून पडल्यानंतर किशनच्या हाताला काही टाके पडले आहेत आणि तो सध्या बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन करत आहे. सूत्रानुसार, हे गंभीर नाही, परंतु खबरदारी म्हणून, त्यालाविश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन चार दिवसांच्या सामन्यांसाठी तो भारत ‘अ’ संघात निवडीसाठी तंदुरुस्त असेल. त्याच्या अनुपस्थितीत, बंगालचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला पूर्व विभागाचा कर्णधार बनवण्यात आले आहे तर आसामचा अष्टपैलू रियान पराग त्याचा उपकर्णधार असेल.
इंग्लंडच्या पाच कसोटी सामन्यांच्या भारत दौऱ्यात ईश्वरन सहभागी होता पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. किशनच्या जागी ओडिशाचा आशीर्वाद स्वेन संघात आला आहे. झारखंडचा कुमार कुशाग्र हा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असण्याची शक्यता आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुलीप ट्रॉफीमधून पुन्हा एकदा पुनरागमन करेल. शमीने गेल्या दोन वर्षात फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. मुकेश कुमार देखील शमीसोबत संघाचा भाग आहे.
हेही वाचा : Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रियान पराग (उप-कर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), आशीर्वाद स्वेन (यष्टिरक्षक), उत्कर्ष सिंग, मनीषी, सूरज सिंधू जयस्वाल, मुकेश कुमार, मुख्तार हुसेन आणि मोहम्मद शमी