Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pro Kabaddi League : पुणेरी पलटणचा दबंग दिल्लीकडूनही पराभव, फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर

पुण्यामध्ये काल पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा पराभव करून गुणतालिकेमध्ये चौथे स्थान गाठले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 10, 2024 | 10:56 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली : काल पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यामध्ये मनोरंजक सामना झाला. वेगवान आणि खोलवर चढाई करणाऱ्या आशु मलिकच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डीच्या ११व्या सीझनमध्ये सोमवारी दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर पुणेरी पलटणचा ३०-२६ असा पराभव केला. या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली. पुणेरी पलटण मात्र आठव्या स्थानावर कायम राहिले. यामुळे गतविजेत्या पुणेरी पलटणला आता उर्वरित प्रत्येक सामना जिंकला तरच या वेळी बाद फेरी गाठता येणार आहे.

सामन्याचे एकूण चित्र दोन्ही संघांच्या सावध पवित्र्यामुळे समान वर्चस्वाचे राहिले होते. पूर्वार्धात बचावपटूंनी आपल्या संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात मात्र पलटणने चढाई आणि बचाव अशा दोन्ही आघाडीवर खेळ उंचावताना दबंग दिल्लीवर दडपण आणण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, उत्तरार्धाच्या तिसऱ्याच मिनिटाला आशु मलिकच्या एका चढाईतील पाच गुणांनी सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतरही पलटणच्या अबिनेश नंदराजन आणि मोहित गोयत यांनी दोनवेळा अव्वल पकड करताना त्या पाच गुणांचे दडपण झुगारले. मात्र, त्यानंतर आशु आणि महत्वाच्या क्षणी नविन कुमारला रोखण्यात पलटणची बचावफळी चुकली.

दबंग छोरों की दहाड़ ने मचाया कोहराम 🔥

लगातार 10वें मैच में रही अपराजित 💙#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #DabangDelhiKC pic.twitter.com/ZEVPAvR7bW

— ProKabaddi (@ProKabaddi) December 9, 2024

सामना २१-२१ अशा बरोबरीत असताना नविनच्या एका खोलवर चढाईत पलटणचे दोन्ही कोपरारक्षक स्वयंचित झाले आणि आशुच्या पाच गुणानंतरही आव्हान राखलेल्या पलटणसाठी ही सर्वात मोठी चूक ठरली. ही संधी साधून नंतर आशु आणि नविनने चोख चढाया करुन दोन मिनिट शिल्लक असताना पलटणवर लोण चढवला. या क्षणी पलटणचा पराभव निश्चित झाला. या सामन्यातून पुण्याच्या गौरव खत्री आणि दिल्लीच्या योगेशने हंगामातील बचावातील गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. आशु मलिकने केलेल्या १९ चढाईपैकी सहा चढाईतच १३ गुणांची कमाई केली. उत्तरार्धात दिल्लीला बाचावातील केवळ दोन गुणांचीच कमाई करता आली. पलटणकडून पंकज मोहिते (५) आणि मोहित गोयत (७) यांनाच चमक दाखवता आली.

WTC Final : ना भारत.. ना ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला फाइनलिस्ट ठरला!

उत्तरार्धात देखील फारसे वेगळे चित्र नव्हते. कुणीच धोका पत्करण्यास तयार नव्हते. पण, उत्तरार्धातील तिसऱ्या मिनिटाला आशुने आपल्या सफाईदार चढाईने पलटणचा बचाव भेदत पाच गडी बाद केले. पलटण या चढाईने मागे राहतील असे वाटले. मात्र, लोणची शक्यता त्यांच्या बचावपटूंनी फेटाळून लावली. प्रथम अबिनेशने दोन खेळाडूंत आशुची आणि काही वेळाने मोहितने अबिनेशच्या साथीत नविन कुमारची पकड करुन लागोपाठ अव्वल पकडीचे चार गुण मिळवून दिल्लीवर पलटवार केला. त्यामुळे उत्तरार्धाचे पहिले सत्र संपले तेव्हा दिल्लीची आघाडी २०-१८ अशी दोन गुणांची मर्यादित राहिली होती.

दुसऱ्या सत्रात पलटणला बचावापेक्षा मोहित गोयतच्या चढायांची साथ मिळाली होती. त्याने दिल्लीच्या बचावफळीचा अभ्यास करत सातत्याने मध्यरक्षकावर लक्ष केंद्रित करुन गडी टिपले. अमनने आशुचा चवडा अचूक पकडून पलटन संघाला प्रथमच २१-२१ असे बरोबरीत आणले. सामना असाच बरोबरीत चालणार असेच वाटत असताना नविनच्या एका खोलवर चढाईवर पलटणचे दोन बचावपटू स्वयंचित झाले. त्यानंतर आशुने एका चढाईत दोन गडी टिपले आणि आकाश शिंदेची पकड करुन दोन मिनिट शिल्लक असताना दिल्लीने पलटणवर लोण देत संघाची आघाडी २९-२५ अशी भक्कम केली. त्यानंतर पुन्हा एकदा सावध खेळ करुन दबंग दिल्लीने विजयला अलगद गवसणी घातली.

Web Title: Pro kabaddi league puneri paltan lost to dabang delhi tough road to finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • Dabang delhi
  • Pro Kabaddi League
  • Puneri Paltan

संबंधित बातम्या

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात
1

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.