पुण्यात 17 वर्षीय अमनसिंग गच्चड याचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इन्स्टाग्रामवरून कात्रज येथे बोलावून खेडशिवापूरला नेऊन दगड व कोयत्याने खून करण्यात आला.
पुण्यातील सहकार नगर परिसरात बनावट इमर्जन्सी कॉल करून डॉक्टरांना बोलावून चाकूच्या धाकात लुटल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टर गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला आहे.
Municipal Corporation Election 2026: पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीसाठी प्रभाग १५ मध्ये भाजपच्या अमित गावडे, राजू मिसाळ आणि पॅनेलच्या प्रचाराचा मारुती मंदिरातून शुभारंभ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे,निकिता कदम, यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. महिलांनी रांगोळी आणि औक्षण करत उमेदवारांचे स्वागत केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पती, सासू-सासऱ्यांनी मारहाण, उपाशी ठेवणे व घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दापोडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात ऑफिसला जातो सांगून घराबाहेर पडलेल्या बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा ७०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला. अपघात की घातपात, याचा तपास सुरू आहे.
पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबू कपूर (56) यांनी 30 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. नोटमध्ये जमीन वादाचा उल्लेख असून मनपा उमेदवार फारुख शेख यांचे नाव आल्याने राजकीय खळबळ उडाली…
पुण्यातील वारजे परिसरात हृदयद्रावक घटना घडली. आजाराने त्रस्त दोन वर्षांच्या चिमुकलीचा आईने हात-पाय बांधून गळा आवळून खून केला. त्यानंतर आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.
निवडणुकीच्या रणधुमाळीत धनकवडी-सहकारनगर भागात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या उमेदवाराचा 'एबी फॉर्म' (AB Form) हिसकावून घेत तो चक्क फाडून गिळून टाकला.
टेम्पो आणि दोन रिक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह, स्पीकर तसेच उमेदवार व अन्य राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार करण्यात येत होता. मात्र, यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आला. त्याने एका महिलेवर बलात्कार केला.
PMC Election 2025: मोठ्या शहरांमध्ये विविध विचारांचे समुदाय असतात. त्यामुळे शहरांचे राजकारण विविध रंगी असते. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष ठळकपणे लढतीत असतातच.
हवामान बदल ही मानव निर्मित समस्या आहे. हवेची गुणवत्ता खराब होत असून त्यातून अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयांची संख्या वाढवण्याऐवजी समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे,…
संजय भीमाशंकर थोबडे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम ४१-ड अन्वय केलेला अर्ज पुणे विभागाचे सह आयुक्त राहुल मामू यांनी नुकताच फेटाळला आहे.
कात्रजच्या आंबेगाव परिसरात प्रेमप्रकरणाच्या वादातून जावेद पठाण या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. आरोपी संदीप भुरके व त्याचा साथीदार फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पुण्याच्या सासवडमध्ये एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं आहे. आरोपीचं मृताच्या पत्नीवर लग्नाआधीपासून प्रेम होतं. लग्न दुसऱ्याशी झाल्याने रागातून त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत विशाल कांबळेचा मृत्यू झाला. बराक क्रमांक 1 मध्ये फरशीने डोके व कंबरेवर वार करण्यात आले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून तुरुंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन, रुंद काँक्रीट, प्रवेश-नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. अशातच आता एक नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधला जाणार आहे.