Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pro Kabaddi League S12 : दबंग दिल्लीचा जलवा कायम! दुसरे PKL जेतेपद केले नावावर; पुणेरी पलटनला चारली धूळ 

प्रो कबड्डी लीग सीझन १२ च्या अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा ३१-२८ अशा फरकाने दणदणीत पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केला आहे. या विजयाने दबंग दिल्लीने आपला दबदबा दाखवून दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 01, 2025 | 02:29 PM
Pro Kabaddi League S12: Dabang Delhi's fire continues! Second KPL title in their name; Puneri Paltan crushed

Pro Kabaddi League S12: Dabang Delhi's fire continues! Second KPL title in their name; Puneri Paltan crushed

Follow Us
Close
Follow Us:

Pro Kabaddi League S12 Winner : प्रो कबड्डी लीग सीझन १२ च्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या त्यागराज इनडोअर स्टेडियमवर एक अभूतपूर्व आणि रोमांचक असा सामना झाला. या सामन्यात दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा ३१-२८ अशा फरकाने दणदणीत पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले आहे. हे दबंग दिल्लीचे दुसरे प्रो कबड्डी लीग जेतेपद ठरले आहे. जे पटना पायरेट्स आणि जयपूर पिंक पँथर्स सारख्या अनेक वेळा विजेत्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाले आहे.

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध लज्जास्पद कामगिरीनंतर टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात कमबॅक करणार का? प्लेइंग 11 मध्ये बदल होणार

हा विजय केवळ खेळाडूंसाठीच नाही तर संघाचे प्रशिक्षक जगिंदर नरवाल यांच्यासाठीही ऐतिहासिक ठरला आहे. मनप्रीत सिंगनंतर, जगिंदर नरवाल प्रशिक्षक आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत काम करताना पीकेएल ट्रॉफी जिंकणारा दुसरा व्यक्ती बनला आहे. या विजयाने पुन्हा एकदा प्रो कबड्डीच्या दृश्यावर दबंग दिल्लीचा दबदबा दिसून आला आहे.

पहिला हाफ: दबंग दिल्लीचे वर्चस्व

दबंग दिल्लीने पहिल्या हाफच्या मध्यात त्यांची आक्रमक रणनीती सुरूच ठेवली. खेळाच्या पंधराव्या मिनिटाला, दिल्लीने पुणेरी पलटणवर सामन्याचा पहिला ऑलआउट केला, त्यांची आघाडी आणखी मजबूत झाली आणि स्कोअर 14-8 वर नेला. या ऑलआउटमुळे दिल्लीला फायदा झाला.

तथापि, पुणेरी पलटणने हात न मानता आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये प्रभावी पुनरागमन करून दाखवले. पंकज मोहिते आणि आदित्य शिंदे सारख्या तरुण खेळाडूंकडून तूट कम करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. तथापि, दिल्लीच्या रेडर्स अजित आणि नीरज यांच्या नेतृत्वाखाली दबंग दिल्लीने त्यांची आघाडी कायम राखली आणि पहिल्या सत्राचा शेवट २०-१४ अशा आघाडीने केला. ही सहा गुणांची आघाडी निर्णायक ठरली.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला, दबंग दिल्लीने त्यांची रणनीतीमध्ये बदल केला आणि मजबूत बचावावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या बचावात्मक कामगिरीमुळे दिल्लीला त्यांची आघाडी टिकवून ठेवण्यास मोठी मदत झाली. दुसरीकडे, पुणेरी पलटणने काही उत्कृष्ट बचावात्मक हालचाली करताना तूट कमी करण्यासाठी सतत गुण मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना न जुमानता, दबंग दिल्लीने त्यांच्या रणनीती आणि नियंत्रणामुळे तिसऱ्या सत्राचा शेवट २४-१८ असा मोठ्या आघाडीने केला.

चौथा आणि शेवटचा क्वार्टर सर्वात रोमांचक आणि तणावपूर्ण असा ठरला. दबंग दिल्लीने सुरुवातीला त्यांची आघाडी कायम ठवली खरी. परंतु पुणेरी पलटणने ३७ व्या मिनिटाला दबंग दिल्लीला त्यांच्या पहिल्या सत्राचा शेवट ऑलआउट करण्यास भाग पाडले. या ऑलआउटमुळे सामना पूर्णपणे स्पष्ट झाला, गुणांमधील फरक फक्त तीन गुणांपर्यंत कमी झाला.

फजल अत्राचलीचा निर्णायक सामना आणि…

शेवटच्या मिनिटांत, पुणेरी पलटणच्या आदित्य शिंदेकडून त्याच्या उत्कृष्ट रेडिंग कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यात आले आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. तथापि, दबंग दिल्लीचा अनुभवी डिफेंडर आणि टीम लीडर, फजल अत्राचलीने एका महत्त्वाच्या क्षणी आपला दर्जा दाखवला. शेवटच्या मिनिटात फजलने एक महत्त्वाचा टॅकल केले, ज्यामुळे पुणेरी पलटणच्या साऱ्या आशा मावळल्या. परिणामी  दबंग दिल्लीने पुणेरी पलटणचा ३१-२८ अशा तीन गुणांनी पराभव करून त्यांचे दुसरे पीकेएल जेतेपद जिंकले.

हेही वाचा : Shreyas iyer Health Update : श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज, BCCI ने भारतात परतण्याची केली घोषणा

 

Web Title: Pro kabaddi league s12 puneri paltan defeated by dabang delhi in pkl title match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Puneri Paltan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.