फोटो सौजन्य - बीसीसीआय
मालिकेतील तिसरा सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे, कारण एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चांगली सुरुवात केली पण तो सामना पावसामुळे झाला नाही. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी फारच निराशाजनक राहिली. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.
Australia win the second T20I by 4 wickets.#TeamIndia will look to bounce back in the next match. Scorecard ▶ https://t.co/7LOFHGtfXe#AUSvIND pic.twitter.com/rVsd9Md9qh — BCCI (@BCCI) October 31, 2025
कालच्या सामन्यामध्ये तर शिवम दुबे याच्या आधी फलंदाजीसाठी हर्षित राणा याला पहिले फलंदाजीसाठी पाठवले होते. त्याचबरोबर त्याला पाठल्यानंतर हर्षित राणा याने संघासाठी 35 धावांची खेळी खेळली. त्यानंतर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा या अभिषेक शर्माने केल्या होत्या त्याच्या जोरावर भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 125 धावा केल्या होत्या. यामधील 68 धावा या फक्त अभिषेक शर्माने केल्या होत्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा सामना हा उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामना भारताच्या संघाला मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी जिंकणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने मागील सामन्यामध्ये फारच निराशाजनक फलंदाजी केली आहे त्यामुळे आता होणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.






