फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप सुरु व्हायला दोन आठवडे शिल्लक आहेत, त्याआधी आता क्रिडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. २९ ऑगस्टपासून प्रो कबड्डी लीग सुरु होणार आहे. प्रो कबड्डी लीगचा हा 12 वा सिझन असणार आहे. मागिल ११ सिझनमध्ये खेळाडूंनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनी देखील या लीगला भरपूर प्रेम दिले आहे. आयपीएलमध्ये ज्याप्रकारे फ्रॅंन्चायझी असतात त्याप्रमाणे प्रो कबड्डी लीगमध्ये देखील फ्रॅंन्चायझीचे संघ असतात.
२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, विविध खेळांमधील दिग्गज प्रो कबड्डी लीगच्या सीझन १२ लाँच करतील. यासाठी, भारतीय बॅडमिंटन दिग्गज पुलेला गोपीचंद, माजी भारतीय हॉकी कर्णधार धनराज पिल्लई आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी एकाच व्यासपीठावर येतील.
हा कार्यक्रम भारताच्या क्रीडा भावनेची एकता अधोरेखित करेल. प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी म्हणाले की, आणखी एक रोमांचक हंगाम सुरू करताना दिग्गज खेळाडू आमच्यासोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हंगाम १२ मध्ये नवीन स्पर्धात्मक स्वरूप देखील पाहायला मिळेल. पहिल्यांदाच, सर्व सामन्यांचे निकाल लागतील आणि लीग टप्प्यातही, ड्रॉ झालेल्या सामन्यांचा निर्णय टायब्रेकरद्वारे घेतला जाईल. पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात होईल.
This National Sports Day, GEN BOLD star #VaibhavSooryavanshi will be in attendance at the launch of #PKL12! 👏
Don’t miss the LIVE action as he gets ready to witness the AGGRESSION unfold on the Kabaddi mat! 🔥#ProKabaddi opening ceremony 👉 FRI, 29th AUG, 7:30 PM pic.twitter.com/Wfh2cQsgFb
— Star Sports (@StarSportsIndia) August 28, 2025
यावेळी सीझन १२ मध्ये एक नवीन स्पर्धात्मक रचना दिसून येईल. प्रत्येक सामन्याचा निकाल लागेल, ड्रॉ झाल्यास टायब्रेकर होतील. लीग आणि प्लेऑफमध्ये ‘प्ले-इन’ टप्पा जोडण्यात आला आहे. टॉप-२ संघ थेट प्लेऑफमध्ये जातील. तिसऱ्या आणि चौथ्या संघांना मिनी-क्वालिफायर खेळावे लागतील. ५ व्या ते ८ व्या क्रमांकाचे संघ प्ले-इन सामन्यांमध्ये भाग घेतील. १२ व्या हंगामाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिळ थलैवाज यांच्यात एका हाय-व्होल्टेज सदर्न डर्बीमध्ये होणार आहे.