यू-मुंबा संघ (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे/युवराज भगत:आमचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे तर आमचे खेळाडू चांगली कामगिरी करताहेत आम्ही निश्चितच यावेळी कप जिंकू, असा विश्वास यू-मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला. यू-मुम्बामध्ये सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत बेस्ट दिला आहे. आणि कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. तरी आम्ही त्यासाठी सबस्टीस्टूट खेळाडू ठेवले आहेत.
सुनील कुमार हे मूळचे हरियाणाचे परंतु ते मुंबईतून खेळत आहेत. सुनील कुमार यांच्याकडेच यू-मुम्बाची धुरा आहे. मुंबईच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी दाखवत गुणतालिकेत आपले स्थान सध्या 6 व्या स्थानाव आहेत. मुंबईच्या खेळाडूंना कमबॅक कसे करायचे हे चांगले माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील यू-मुम्बा आणि पुणेरी पलटण हे दोन संघ चांगला खेळ करीत आहेत.
प्रो-कबड्डी लीगचे पुढील सामने पुण्यात होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील यू-मुम्बा आणि पुणेरी पलटण या दोन संघान घरच्या ग्राऊंडव खेळण्याचा फायदा होणार की नाही हे येत्या काही दिवसांतच समोर येणार आहे. तत्पूर्वीच यू-मुम्बाच्या कर्णधार सुनील कुमार याने आपण निश्चितच चषक जिंकू असा विश्वास नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला.
रोमांचक सामन्यात बंगळुरूवर मिळवला होता विजय
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सेशनमध्ये यु मुम्बाला बंगळुरूने शेवटपर्यंत झुंजवले परंतु अखेरच्या क्षणी मुंबईने जोरदार चढाई करीत विजयाला गवसणी घातली. अखेरच्या एक मिनिटात पकड आणि चढाईत तीन गुणांची कमाई करीत मनजीतने प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या एका संघर्षपूर्ण सामन्यात यु मुम्बाला बंगळुरु बुल्सविरुद्ध ३४-३२ असा विजय मिळवून दिला. मनजीतचा हा एक मिनिटांतील प्रभावी खेळ आणि पूर्वार्धात अजित चौहान, रिंकू सिंग आणि सोमवीर यांच्या एकत्रित खेळ हेच यु मुम्बाच्या आजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
बंगळुरूने दिली झुंज
पूर्वार्धातील यु मुम्बाचा झपाटा आणि मध्यंतराला मिळविलेली मोठी आघाडी बघता सामना एकतर्फी होणार अशीच चिन्हे होती. मात्र, उत्तरार्धात मुम्बाकडून खेळची गती संथ करण्यात आली. याचा फायदा बंगळुरुच्या खेळाडूंनी उचलला. विशेषतः या कलावाधीत सुशीलने केलेल्या चढाया निर्णायक ठरल्या. त्यामुळे बंगळुरुने सामन्यातील आव्हान राखत हंगामातील तिसऱ्या विजयासाठी शिकस्त कायम राखली होती. पूर्वार्धात भक्कम राहिलेला मुम्बाचा बचाव उत्तरार्धात फिका पडला.
अखेरचा एक मिनिट ठरला निर्णायक
रिंकूकडून पाच सोमवीरचे दोन, परवेशचे तीन प्रयत्न अपयशी ठरले. तुलनेत सुशीलने ८ गुणांची कमाई करुन परदिपच्या अपयशानंतरही बंगळुरुचे आव्हान राखले होते. परदिपने सहा गुणांची कमाई केली. पण, त्यासाठी त्याने तब्बल १६ चढाया केल्या आणि हेच अपयश बंगळुरुला पुन्हा एकदा महागात पडले. मुम्बाकडून मनजीतने ८, अजित चौहानने ७, रिंकू सिंगने ४ गुणांची कमाई करुन मुम्बाचा विजय साकार केला.
यू-मुम्बाचे खेळाडू –
डिफेन्डर –
सुनील कुमार (कर्णधार), परवेश भैन्सवाल, अजित चौहान, संबीर, अमीर मोहम्मद झफरदानेश, रिंकू, मनजीत, एस मुकीलन
अष्टपैलू खेळाडू –
रोहित राघव, लोकेश घोसलिया, अमिन घरबानी, एम धनसेकर, दीपक कुंडु, सतीश खन्ना, शुभम कुमार, एम गोकुलकानन, बिट्टू, आशिष कुमार, सनी, स्टुअर्ट सिंग, विशाल चौधरी