Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Drunk and Drive: दारूच्या नशेत भरधाव कार थेट बंगल्याच्या गेटवर; गेट तोडून डस्टरचेही नुकसान

Pune Crime News: हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. गाडी बंगल्याच्या गेटला धडकल्याने गेट तुटले आणि कारचे नुकसान झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2026 | 05:00 PM
Pune News, Magarpatta, Hadapsar Police, Drunk Driving

Pune News, Magarpatta, Hadapsar Police, Drunk Driving

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत कारचालकाची बंगल्याच्या गेटला धडक
  • नमिता धाडवे यांच्या रेनॉल्ट डस्टर कारचेही नुकसान
  • हडपसर पोलीस ठाण्यातअमर पाटीलवर गुन्हा दाखल
Pune Crime News: मगरपट्टा परिसरात दारूच्या नशेत भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या चालकाने बंगल्याच्या गेटला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत गेट तुटले असून, बंगल्याच्या मालकाच्या रेनॉल्ट डस्टर कारचेही नुकसान झाले. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

अमर तात्याराव पाटील (वय ३३, रा. शांती रेसिडेन्सी, फ्लॅट क्रमांक १०३, लोणीकंद, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. मगरपट्टा येथील मलबारी गार्डनमधील बंगला क्रमांक २० च्या गेटला त्याच्या कारने धडक दिली. यामध्ये गेटचे नुकसान झाले तसेच बंगल्याच्या मालक नमिता धाडवे यांच्या रेनॉल्ट डस्टर कारचेही नुकसान झाले.  (Drunk and Drive)

Rohit Pawar PC: SIR – निवडणूक आयोगाचे कारनामे’ दाखवत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. गाडी बंगल्याच्या गेटला धडकल्याने गेट तुटले आणि कारचे नुकसान झाले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८९ आणि ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अन्य कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नसून, कोणीही जखमी झालेले नाही.

लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करणे, या गंभीर गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर निकाल दिला आहे. एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख २५ हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष तसेच न्यायालयात सादर करण्यात आलेले महत्त्वाचे पुरावे आरोपीला गजाआड ढकलण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरले.

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकार

 

लग्नाचे आमिष, पळवून नेणे अन् वारंवार अत्याचार

हा संपूर्ण प्रकार २०२० मध्ये उघडकीस आला होता. आरोपी महंमद साकिब शफी अहमद शेख (वय ३२, रा. नागपाडा, मुंबई) याने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलगी अल्पवयीन आहे हे स्पष्टपणे माहीत असतानाही, आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिला लग्नाचे गोड आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या राहत्या घरातून गुपचूप पळवून मुंबईला नेले.

मुंबईत पोहोचल्यानंतर आरोपी महंमद साकिब याने नागपाडा आणि आसपासच्या विविध भागांमध्ये वेळोवेळी भाड्याने खोल्या घेतल्या. मुलीला तेथे ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध आणि ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांनी तातडीने पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que:  मगरपट्ट्यातील कार अपघाताची घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: ही घटना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास पुणे येथील मगरपट्टा परिसरातील मलबारी गार्डन, बंगला क्रमांक २० येथे घडली.

  • Que:  अपघातातील आरोपी कार चालक कोण आहे?

    Ans: लोणीकंद येथील शांती रेसिडेन्सीमध्ये राहणारा ३३ वर्षीय अमर तात्याराव पाटील असे आरोपीचे नाव आहे.

  • Que:  पोलिसांनी चालकावर कोणती कारवाई केली आहे?

    Ans: हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. मद्यपान करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune magarpatta drunk driving car crashes into bungalow gate hadapsar police as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • pune crime news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.