फोटो सौजन्य - Punjab Kings
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ च्या बाहेर : पंजाब किंग्सचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सध्या खराब फॉर्ममध्ये आहे त्याने संघासाठी आयपीएल २०२५ मध्ये एकही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. संघाने त्याला सातत्याने विश्वास दाखवला आहे. पण तो या सीझनमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. असे म्हणतात की नशिबात लिहिलेले कोणीही पुसून टाकू किंवा बदलू शकत नाही. जे घडायचे आहे ते घडेलच, मग ते लवकर घडो किंवा तुम्हाला त्याची वाट पहावी लागेल. आता ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल २०२५ चा बायबाय करावे लागले आहे, त्यामुळे आता त्याच्या जागेवर पंजाब किंग्सच्या संघाने नव्या खेळाडूंना संधी दिली आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
२३ वर्षीय ऑस्ट्रेलियन अनकॅप्ड खेळाडूने पंजाब किंग्ज संघात प्रवेश केला आहे, ज्याला जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. ग्लेन मॅक्सवेल, ज्याला बोटाच्या फ्रॅक्चरमुळे स्पर्धेमधून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी प्रीती झिंटाने ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिच ओवेनला पंजाब संघात स्थान मिळाले आहे. मिच ओवेनने अद्याप ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलेले नाही परंतु तो सध्या पीएसएलमध्ये पेशावर झल्मीकडून खेळणारा एक अनकॅप्ड परदेशी खेळाडू आहे.
UPDATE: Mitchell Owen replaces Glenn Maxwell for the rest of #TATAIPL 2025 season. pic.twitter.com/yX7Z8uamMt
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 4, 2025
ऑस्ट्रेलियातील तस्मानियाचा मिच ओवेन याने ३४ टी-२० सामने खेळले आहे आणि यामध्ये त्याने ६४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि १०८ धावा हा त्याचा सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड आहे. त्याच्या नावावर १० टी-२० विकेट्सही आहेत. तो सध्या पीएलएलमध्ये पेशावल झल्मीकडून खेळत आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. पीएसएल सिझनमध्ये पेशावर झल्मीने त्याला ३ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
IPL 2025 मध्ये पक्षपात? चेन्नईच्या पराभवाचे कारण अंपायर! नॉट आउट डेवॉल्ड ब्रेव्हिसला फसवलं
ESPNcricinfo च्या अहवालानुसार, मिशेल ओवेन त्याचा झल्मी संघाचा प्रवास संपल्यानंतर भारतात येणार आहे. सध्या, पेशावर झल्मी संघ पीएसएलमध्ये पाचव्या स्थानावर आहे आणि त्यांचा शेवटचा गट स्टेज सामना ९ मे रोजी खेळला जाणार आहे. जर झल्मी प्लेऑफसाठी पात्र ठरला, तर मिशेल ओवेन १८ मे रोजी होणाऱ्या पीएसएल फायनलपर्यंत स्पर्धा सोडणार नाही.
ओवेन आयपीएलमध्ये बदली खेळाडू बनण्यास पात्र आहे, कारण त्याने गेल्या वर्षीच्या अखेरीस लिलावासाठी नोंदणी केली होती, परंतु त्याला अंतिम शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळाले नाही. तस्मानियाचा २३ वर्षीय टॉप-ऑर्डर फलंदाज ओवेन हा बीबीएलच्या नवीनतम सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. होबार्ट हरिकेन्सच्या जेतेपदाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात त्याने ४२ चेंडूत १०८ धावा करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. ओवेनने ११ डावांमध्ये ४५.२० च्या सरासरीने आणि २०३.६० च्या स्ट्राईक रेटने ४५२ धावा केल्या.