PBKS Team IPL 2025 Players List
PBKS Team IPL 2025 Players List : पंजाब किंग्जने मेगा लिलावात श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्यावर प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मॅक्सवेल, स्टॉइनिससारखे ऑलराऊंडरसुद्धा संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंगसारख्या भारतीय खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना कायम ठेवून मोठा जुगार
पंजाब किंग्जने मेगा लिलावापूर्वी केवळ दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना कायम ठेवून मोठा जुगार खेळला होता. पंजाब फ्रँचायझीला त्यांचा संपूर्ण संघ नव्याने लिलावात तयार करायचा होता. सर्वाधिक पर्स घेऊन लिलावात उतरलेल्या पंजाबने मोठी रक्कम भरून श्रेयस अय्यरला करारबद्ध केले आहे. एक-दोन दिवसांत त्याला कर्णधार बनवण्याबाबत अधिकृत दुजोरा मिळेल. 2024 मध्ये कोलकाता चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला 26.75 रुपयांची बोली लागली. पंजाब किंग्जने भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्यावर प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च केले. लिलावात ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा आणि हरप्रीत ब्रार यांसारख्या अनेक भारतीय आणि परदेशी अष्टपैलू खेळाडूंचाही या संघात समावेश होता.
आता पंजाब किंग्जचा हा संपूर्ण संघ : श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग,
नेहल वढेरा, हरप्रीत ब्रार, मार्को यानसेन, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, अजमातुल्ला ओमरझाई, लॉकी फर्ग्युसन, ॲरॉन हार्डी, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, प्रवीण दुबे, विष्णू विष्णू, विष्णुजादा , यश ठाकूर
मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच आपले इरादे केले स्पष्ट
विल जॅकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, पंजाबचे व्यवस्थापनही चांगल्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते, मात्र 5 कोटी रुपये आल्यानंतर पंजाबने आपला हट्ट सोडला. मुंबईने लावलेली शेवटची बोली ५.२५ कोटी रुपये होती. बंगळुरू व्यवस्थापनाने ‘नाही’ होण्यापूर्वीच, लिलावाचे आयोजन करणाऱ्या मल्लिका सागरला आरटीएम वापरून RCB बद्दलचे तिचे वाक्य पूर्ण करता आले नाही.
आरसीबीचे आश्चर्यचकीत करणारे निर्णय
IPL 2025 च्या मेगा लिलावाच्या दुस-या दिवशी जेव्हा विल जॅक्सचे नाव पुकारले गेले तेव्हा सर्वांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या व्यवस्थापनाकडे लागल्या होत्या. जॅकला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सुरुवातीपासूनच आमने-सामने होते, पण इथे कुठेही आरसीबीचे नाव दिसत नव्हते. बंगळुरू संघानेही जॅकवर राईट टू मॅच कार्ड वापरण्यास स्पष्टपणे नकार दिला. या निर्णयामुळे केवळ चाहतेच संतापले नाहीत, तर सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ यांनीही यासंदर्भात तिखट विधाने केली आहेत.
IPL Auction मध्ये पंजाब किंग्जने खरेदी केले हे खेळाडू
प्लेयर | कीमत |
अर्शदीप सिंह | 18 कोटी |
श्रेयस अय्यर | 26.75 कोटी |
युजवेंद्र चहल | 18 कोटी |
मार्कस स्टोइनिस | 11 कोटी |
ग्लेन मैक्सवेल | 4.2 कोटी |
नेहल वढेरा | 4.2 कोटी |
हरप्रीत बराड़ | 1.5 कोटी |
विष्णु विनोद | 95 लाख |
विजयकुमार वैश्य | 1.8 कोटी |
यश ठाकुर | 1.8 कोटी |
मार्को जानसन | 7 कोटी |
जोश इंग्लिस | 2.6 कोटी |
लॉकी फर्ग्यूसन | 2 कोटी |
अज़मतुल्लाह उमरजई | 2.4 कोटी |
हरनूर पन्नू | 30 लाख |
कुलदीप सेन | 80 लाख |
प्रियांश आर्य | 3.8 कोटी |
एरोन हार्डी | 1.25 कोटी |
मुशीर खान | 30 लाख |
सूर्यांश शेडगे | 30 लाख |
जेवियर बार्टलेट | 80 लाख |
पाइला अविनाश | 30 लाख |
प्रवीण दुबे | 30 लाख |
हेही वाचा :