मॅजीशियन्स्, लिजेंडस्, किंग्ज् संघांची आगेकूच (फोटो- सोशल मिडिया)
पुना क्लब मॅजीशियन्स् संघाने आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ५-० अशा एकाच फरकाने सलग दोन सामन्यांत पराभव करत शानदार दुहेरी विजय मिळवला. या विजयात विग्नेश संघवी, दिनेश मेहतानी, कपिल पंजाबी, अनिल काकडे, अनिश केअरींग, अंगद सहानी आणि सुरज राठी या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत आरसीबीसी लिजेंडस् संघाने डेक्कन जिमखाना ऐसेस संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. पहिल्या लढतीत आरसीबीसीच्या झुबिन रजिस्ट्रारने सिध्दार्थ टेंबेचा १०७-७८ असा पराभव करत संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात डेक्कनच्या प्रशांत नातूने मजहर ताहेरबॉयला ४३-२९ असे पराभूत करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आरसीबीसीच्या विजय नचानीने डेक्कनच्या मिहीर गोखलेचा १५१-१०९ असा पराभव करत आघाडी मिळवून दिली.
डेक्कनच्या अर्चिन पळनीटकरने आरसीबीसीच्या रिशी रामय्याचा ४६-३५ असा पराभव करून सामन्यात पुन्हा २-२ अशी बरोबरी आणली. शेवटच्या निर्णायक लढतीत अंतिम दुहेरी लढतीत आरसीबीसीच्या वेदांत दोशी व पंकज सहानी जोडीने डेक्कनच्या समर खंडेलवाल व उदय पुंडे जोडीचा ५९-४८ असा पराभव करून संघाला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून दिला.
Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी
दुसऱ्या एका लढतीत पुना क्लब किंग्ज् संघाने जयराज ब्लास्टर्स संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात राजीव खांडके, पंकज परमार, प्रशांत राजघरीया, कुणाल वासवानी, गिरीष दामले आणि विशाल अरोरा यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचे योगदान दिले.






