सर्वेश कुशारेने जिंकले रौप्य पदक (फोटो- ians)
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या उंच उडी क्रीडा प्रकारात भारताने तब्बल 56 वर्षांनी पदक जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त केली आहे. त्याच्याआधी 1970 च्या एशियन गेम्स स्पर्धा बँकॉक येथे झाली होती. यामध्ये या क्रीडा प्रकारात भारताने पदक जिंकले होते. नंतर तब्बल साडेपाच दशके भारताला या क्रीडा प्रकारात पदकाची प्रतीक्षा करावी लागली होती. सर्वेश कुशारेच्या या कामगिरीमुळे भारताचा हा प्रदीर्घ पदकांचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे.
Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी
सर्वेश या स्पर्धेत जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. त्याने सुरूवातीच्या फेऱ्या अगद सहज पूर्ण केल्या. त्याने 2.25 मीटरच्या उंच उडी प्रकारात यशस्वी उडी मारली. फायनलमध्ये त्याने पदक जिंकण्यासाठी कडवी झुंज दिली. त्याच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आणि त्याने देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे. त्याच्या या कामगिरीने मैदानातील उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
🇮🇳🥈 A GIANT LEAP FOR INDIAN ATHLETICS! Sarvesh Kushare soars to 2.25m to claim the Silver Medal in the Men’s High Jump at #AsianGames2026. 🏆 A historic achievement that ends India’s 56-year wait for a medal in this event and adds another memorable chapter to the nation’s… pic.twitter.com/yIhHwUnTft — Dr. Anil Jain (@aniljaindr) September 28, 2026
सर्वेश कुशारे हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र आहे. त्याचा एशियन गेम्समध्ये जाण्याचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी असा राहिलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कठोर परिश्रम आणि सततच्या सरावाच्या जोरावर त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करत आज एशियन गेम्समध्ये देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवली आहे.
Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी सर्वेश कुशारे आणि चीनी तैपेईचा खेळाडू चाओ ह्सुआन-फू यांच्यात अत्यंत तीव्र चुरस पाहायला मिळाली. दोघांनीही २.२५ मीटरची समान उंची यशस्वीरीत्या पार केली. मात्र, चाओ ह्सुआन-फू याने ही २.२५ मीटरची उंची आपल्या पहिल्याच प्रयत्नात पार केली, तर सर्वेशला ही उंची गाठण्यासाठी दोन प्रयत्न करावे लागले. त्यामुळे सर्वेशचे गोल्ड मेडल जिंकण्याची संधी हुकली.






