R Ashwin Padma Shri : आर अश्विन पद्मश्री पुरस्कार जाहीर; पीआर श्रीजेश होणार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
R Ashwin Padma Shri : भारताचा दिग्गज ऑफस्पीनर रविचंद्रन अश्विनने नुकतेच त्याच्या कारकिर्दीतील गाबा टेस्टमध्ये मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता या स्टार क्रिकेटर देशाचा सर्वोच्च परस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा पीआर श्रीजेश पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होणार आहे.
श्रीजेश हा सन्मान मिळवणारा दुसरा हॉकीपटू
नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय हॉकीचे महान गोलकीपर पीआर श्रीजेश यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. श्रीजेश हा मेजर ध्यानचंद (१९५६) नंतर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होणारा दुसरा हॉकी खेळाडू आहे.
या खेळाडूंना केले आहे सन्मानित
देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीसाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये भारताचे महान फुटबॉलपटू आयएम विजयन आणि पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला पॅरा अॅथलीट हरविंदर सिंग यांचा समावेश आहे. पॅरा अॅथलेटिक्स प्रशिक्षक सत्यपाल सिंग, जे खेलरत्न पुरस्कार विजेते पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते उंच उडी पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार यांचे प्रशिक्षक देखील आहेत, त्यांनाही पद्मश्री प्रदान करण्यात येईल. श्रीजेश हा मेजर ध्यानचंद (१९५६) नंतर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होणारा दुसरा हॉकी खेळाडू आहे.
रविचंद्रन अश्विनची शानदार कारकीर्द
रविचंद्रन अश्विनने टेस्टमध्ये 537 विकेट, एकदिवसीय सामन्यात 156 विकेट घेतल्या तर टी-20मध्ये 72 विकेट तर आयपीएल मध्ये 180 बळींचे योगदान दिले. भारतीय संघासाठी अश्विनचे योगदान कायम लक्षात राहील. रविचंद्रन अश्विन क्रिकेटचे चांगले ज्ञान होते, जे त्याने नवीन होतकरू खेळाडूंना घडवून दाखवले. आपल्या उपस्थितीच भारताला चांगले स्पीनर मिळावेत यासाठीसुद्धा त्याने प्रयत्न केले.
भारतासाठी महत्त्वपूर्ण इनिंग
गाबा टेस्टमध्येच आपल्या कारकिर्दीला अश्विनने पूर्णविराम दिल्याने अनेक खेळाडू हर्ट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अश्विनने टेस्टमध्ये 106 कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या. अश्विनची कसोटी कारकीर्द शानदार राहिली. भारतीय संघाला अनेकवेळा कसोटी एकहाती विजय मिळवून देण्यात अश्विनचे मोठे योगदान राहिले. अश्विनने 116 एकदिवसीय सामने खेळले यामध्ये त्याने 156 विकेट घेतल्या. त्यानंतर 65 टी-20 सामने खेळे ज्यामध्ये त्याने 72 विकेट घेतल्या. तर आपीएलमध्ये त्याने 211 सामने खेळत 180 विकेट आपल्या नावावर केल्या.
सत्यपाल म्हणाले, ‘इतक्या लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला हा सन्मान मिळाला. मी २०१८ पासून प्रवीण कुमारसोबत आहे आणि या पुरस्कारासाठी तो खूप श्रेय देण्यास पात्र आहे. पॅरिसमध्ये सलग दुसरे ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्यानंतर हॉकीमधून निवृत्त झालेला श्रीजेश सध्या भारतीय ज्युनियर पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय हॉकीच्या महान गोलकीपरपैकी एक, श्रीजेश हा ४१ वर्षांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या ऑलिंपिक पदकाचा शिल्पकार होता. त्याने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत ३३६ सामने खेळले आणि आशियाई स्पर्धेत दोनदा सुवर्णपदकही जिंकले.
खेळाडूंची कारकीर्द
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मध्यभागी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १०६ सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. अश्विन २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. २०११ ते २०२० दरम्यान त्याची आयसीसीच्या दशकातील कसोटी संघात निवड झाली. दरम्यान, ‘कैथलचा एकलव्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३३ वर्षीय हरविंदरने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रिकर्व्ह ओपन प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. लहानपणी जेव्हा त्याला डेंग्यू झाला तेव्हा त्याला चुकीचे इंजेक्शन देण्यात आले ज्यामुळे त्याच्या पायात विकृती निर्माण झाली.
५५ वर्षीय विजयन यांनी २००० ते २००४ पर्यंत भारताचे नेतृत्व केले आणि बायचुंग भुतियासह भारतीय आक्रमणाचा मुख्य आधारस्तंभ होते. पद्मभूषण हा भारतरत्न आणि पद्मविभूषण नंतरचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यावर्षी सात व्यक्तींना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना विविध क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.