Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“….आश्चर्य वाटते IPL मध्ये नक्की क्रिकेट आहे का?’; आर अश्विनचे खळबळजनक वक्तव्य; क्रीडा विश्वात जोरदार चर्चा

R Ashwin on IPL : आयपीएलबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. IPL मुळे खेळावर होणाऱ्या परिणामावर दिग्गजांनी अनेकदा मते मांडली आहेत. असे असताना आता आर अश्विनने आयपीएलबाबत बोलताना कधी कधी खेळ मागे पडत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 29, 2024 | 02:50 PM
R Ashwin

R Ashwin

Follow Us
Close
Follow Us:
R Ashwin on IPL : भारताचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. दरम्यान, 37 वर्षीय अश्विनने नुकतेच आयपीएलबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, कधीकधी आयपीएल क्रिकेट आहे, याचे आश्चर्य वाटते. आयपीएलने गेल्या 17 वर्षात केलेला विकास पाहून अश्विनने हे भाष्य केले आहे.
सराव आणि जाहिरांतीचे शूट यादरम्यान कसरत
अश्विनने आयपीएलदरम्यान खेळाडूंना सराव आणि जाहिरांतीचे शूट यादरम्यान त्यांचा वेळ मॅनेज करण्याचे आव्हान पेलावे लागते असेलही सांगितले आहे. तो इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट होस्ट करत असलेल्या क्लब प्रेरिए फायर पॉडकास्टमध्ये बोलत होता.
अश्विन म्हणाला, ‘युवा खेळाडू म्हणून जेव्हा मी आयपीएलमध्ये आलो होतो, तेव्हा मी फक्त दिग्गज खेळाडूंकडून शिकण्याचा विचार करत होतो. मी हा विचार नव्हता केला की १० वर्षांनंतर आयपीएल कसे असेल. आता इतके आयपीएल हंगाम खेळल्यानंतर मी असं म्हणू शकतो की आयपीएल खूप मोठे आहे.’
कधीकधी जाहिरातींच्या शुटमध्ये आणि सेट्सवर सराव
‘कधीकधी मला आश्चर्य वाटते की आयपीएल हे क्रिकेटही आहे का, कारण बऱ्याचदा आयपीएलवेळी खेळ मागे पडतो, इतके हे मोठे आहे. आम्ही कधीकधी जाहिरातींच्या शुटमध्ये आणि सेट्सवर सराव करतो, इथपर्यंत आयपीएल पोहोचले आहे.’ आयपीएलने आता मीडिया हक्काबाबतही इंग्लिश प्रीमियर लीग, एनबीए, मेजर लीग बेसबॉल अशा मोठ्या स्पर्धांना मागे टाकले आहे.
दरम्यान, अश्विनने आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणीही सांगितल्या आहेत. अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. अश्विन म्हणाला, ‘आयपीएलचा एवढा विकास होईल, असा विचार कोणीही केला नव्हता. मला अजूनही स्कॉट स्टायरीसबरोबर झालेली चर्चा आठवते. तेव्हा आम्ही दोघेही सीएसके संघात होतो.’
‘त्याने मला म्हटले होते की तो जेव्हा पहिल्या हंगामात आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळलेला, तेव्हा त्याने विचार नव्हता केला की आयपीएल 2-3 वर्षापेक्षा अधिककाळ टिकेल. सुरुवातीला पैशाची मोठी आवाक होती.’
अश्विन पुढे म्हणाला, ‘अनेकवर्षांपासून तुम्ही पाहिले तर आयपीएल एक अशी स्पर्धा आहे, जी सर्वात आधी लिलावातही जिंकली जाते. मला वाटते लिलाव या स्पर्धेचा खूप महत्त्वाचा भाग आहे, पण आयपीएलची खरी मजा यात आहे की फ्रेँचायझी त्यांच्या संघाची योग्य संघबांधणी कशी करतात.’
‘एकच पद्धत लागू होत नाही. कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नसतो. कोणतीही जागा कोणापेक्षा मोठी नसते. संघाला हुशारीने विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागते.’ अश्विन जवळपास 16 वर्षांपासून आयपीएल खेळत असून त्याने चेन्नई सुपर किंग्सनंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: R ashwins sensational statement and sports world hotly debated wonder if ipl really has cricket nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • Indian Premier League

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.