Rajasthan Royals Gave a Lot of Money to Govinda's Son-in-Law Nitish Rana for 4.2 crores He has Captained Shahrukh Khan's Team
IPL Mega Auction 2025 : IPL 2025 च्या मेगा लिलावात, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या खेळाडूला विकत घेतले नाही ज्याने त्यांना कठीण काळात कर्णधार केले होते. हा खेळाडू दुसरा कोणी नसून नितीश राणा आहे. मेगा लिलावात नितीश राणाला राजस्थान रॉयल्स संघाने चांगली रक्कम देऊन विकत घेतले.
राजस्थान रॉयलने केले खरेदी
Talented Delhi middle-order batter Nitish Rana will be the newest royal in IPL 2025.
For live Auction updates:👉 https://t.co/Gehu8l4DG6 pic.twitter.com/Mpk9QbTpRm
— CricTracker (@Cricketracker) November 25, 2024
नितीश राणाला 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले
IPL 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने नितीश राणाला 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या नितीश राणाला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जनेही सर्वतोपरी प्रयत्न केले होते, मात्र राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना जिंकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या आधीच्या फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणासाठी एकही बोली लावली नाही.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर नितीश राणाने संघाची धुरा सांभाळली
नितीश राणा यांनी केकेआरचे नेतृत्व केले आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर नितीश राणाने संघाची धुरा सांभाळली, पण दुर्दैवाने केकेआरने मेगा लिलावात त्याच्यात रस दाखवला नाही. अशा स्थितीत नितीश राणा आता राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये आपली जादू दाखवणार आहेत. नितीश राणा मधल्या फळीत फलंदाजी करणारा खेळाडू तसेच अर्धवेळ फिरकीपटू आहे.
नितीश राणा बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई असल्याचं समजतंय. वास्तविक, नितीशने एका टीव्ही शोमध्ये गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेकला सांगितले की, नितीश राणाची पत्नी सांची मारवाह ही त्याची चुलत बहीण आहे. अशा स्थितीत नितीश राणा त्यांचे मेव्हणे झाले. गोविंदाची भाची सांची मारवाह हिचा नवरा असल्याने नितीश राणा त्यांचा जावई झाला.
मुंबई इंडियन्सकडून ओळख मिळाली
नितीश राणाने 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2017 च्या मोसमात मुंबईने त्याला सतत संधी दिली आणि मधल्या फळीत नितीशने 12 डावात 333 धावा केल्या. यामध्ये अनेक मॅचविनिंग इनिंग्सचाही समावेश होता. IPL 2018 च्या लिलावात KKR ने त्याला 3.4 कोटी रुपयांना विकत घेतले. 2022 च्या लिलावात KKR ने त्याला विकत घेण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले, पण IPL 2025 साठी KKR ने नितीशवर बोली लावली नाही.
IPL Mega Auction 2025 धक्कादाय निर्णय
आज आयपीएल 2025 मेगा लिलावाचा दुसरा दिवस, यामध्ये आजचा दिवस मोठा आश्चर्यचकीत करणारा राहिला. मयंक आगरवाल आणि पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिले. तर फाफ डु प्लेसिस हा दिल्ली संघाचा भाग बनला आहे. शार्दुल ठाकूर ठरला अनसोल्ड.
हेही वाचा : IPL Auction 2025 Live : आज खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस; तर ‘या’ खेळाडूंवर असणार फ्रॅंचायझींची नजर