Shreyas Stunning Double Century in Ranji Trophy
Ranji Trophy 2024 : भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने रणजी करंडकमध्ये आपल्या बॅटची चमक दाखवून दिली आहे. नुकतेच IPL 2025 लिलावामध्ये केकेआरमधून बाहेर पडलेल्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयसने रणजीमध्ये धमाकेदार द्विशतक ठोकत आपली ताकद दाखवली आहे. त्याचबरोबर त्याची द्विशतकाची तब्बल 7 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. भारत अ संघासाठी त्याने शेवटचे द्विशतक 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते.
श्रेयस अय्यरने रणजीमध्ये ठोकले द्विशतक
Double 💯for Shreyas Iyer 👏👏https://t.co/s63scHvd14#RanjiTrophy2024 #Indiacricket pic.twitter.com/JZDSEoz1LY
— Cricbuzz (@cricbuzz) November 7, 2024
श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक
भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याने प्रथम श्रेणीतील द्विशतकाची 7 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. गुरुवारी रणजी ट्रॉफी सामन्यात ओडिशाविरुद्ध मुंबईसाठी 201 चेंडूत 200 धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी संघ कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन बनवल्यानंतरही संघाने मेगा लिलावापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले.
5 व्या क्रमांकावर येऊन शानदार फलंदाजी
श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करीत मुंबईसाठी द्विशतक झळकावले आहे. हे त्याचे 7 वर्षातील पहिले द्विशतक होते. शेवटचे द्विशतक 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळत असताना त्याने नाबाद 202 धावा केल्या होत्या. मुंबईसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अय्यरने धमाका केला. पहिल्या दिवसाच्या खेळात 152 धावा करून नाबाद परतलेल्या या फलंदाजाने दुसऱ्या दिवशी आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने 24 चौकार आणि 9 षटकार मारत 33 चौकार मारत 228 चेंडूत 233 धावांची खेळी केली.
श्रेयस अय्यरला पुन्हा एकादा गवसला सूर
टीम इंडियातून बाहेर असलेला अय्यर फॉर्ममध्ये परतला आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. यानंतर त्याने त्रिपुराविरुद्धचा सामना सोडला आणि आता ओडिशाविरुद्ध द्विशतक ठोकले. अय्यरने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती आणि पाठीच्या दुखापतीमुळे तो मालिकेच्या मध्यभागी बाहेर पडला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याचा केंद्रीय करारही संपुष्टात आला. ओडिशाविरुद्धच्या पहिल्या दिवशी, अय्यरने वेगवान खेळी खेळली आणि अवघ्या 101 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि चार षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. अय्यरने 201 चेंडूत 22 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केले.
श्रेयस अय्यरचे वेगवान शतक
भारतीय फलंदाज अय्यरने आतापर्यंत 164 चेंडूंच्या खेळीत 18 चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याचे हे सलग दुसरे रणजी शतक ठोकले आहे. गेल्या सामन्यात त्याने 142 धावा केल्या होत्या. 41व्या षटकात बिप्लब सामंतरेने सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी (92 धावा, 124 चेंडू, 13 चौकार, तीन षटकार) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (0) यांना सलग चेंडूंवर बाद केल्यावर अय्यर आणि लाड एकत्र आले. अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा फलंदाजीत आपली जादू दाखवता आली नाही. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉच्या जागी आंगक्रिशचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : इकडे रोहित-विराट धावांसाठी रडताहेत; तिकडे रणजी करंडकमध्ये श्रेयस अय्यरचा धुरळा; ठोकले झंझावती शतक
हेही वाचा : IPL 2025 मध्ये सौदीमध्ये 24, 25 नोव्हेंबरला रंगणार खेळाडूंचा बाजार; 2 कोटी रुपयांपासून लागणार बोली सुरू