From Rohit and Virat to Saurabh Netravalkar, Indian netizens take to social media to cheer for a new set of favorite players this World Cup
राशिद खान : T-२० विश्वचषकाच्या (T-20 World Cup 2024) उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानचा (South Africa vs Afghanistan) संघ ५६ धावांवर सर्वबाद झाले. या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांची फायनलमध्ये जाण्याची संधी हुकली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ सुद्धा पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर संघाने आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. या विश्वचषकात अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या विश्वचषकात दमदार कामगिरी करून कमी धावसंख्येत सुद्धा विजय मिळवला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला.
अफगाणिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान (Rashid Khan) भावूक झाला आणि त्याने या पराभवाचे कारणही सांगितले. यावेळी त्याने पराभवाचे कारण स्पष्ट केले. यावेळी तो म्हणाला की, “हा सामना आमच्यासाठी कठीण होता. एक संघ म्हणून आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकलो असतो. मात्र, मैदानाची स्थिती आमच्या नुसार नव्हती. पण कोणत्याही परिस्थिती, खरे सांगायचे तर, आमची फलंदाजी थोडी धक्कादायक होती, पण नबी आणि फझलने आमची फिरकी गोलंदाजी सोपी केली “सातत्य आवडले.”
पुढे तो म्हणाला की, आम्ही उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी खेळू असे जर कोणी आम्हाला स्पर्धेपूर्वी सांगितले असते, तर आम्ही आनंदाने ते मान्य केले असते. या स्पर्धेमध्ये मोठे सामने जिंकणे त्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. अशा कारची स्पर्धा, विशेषत: मधल्या फळीत तुम्ही स्वतःला कसे हाताळता हे महत्त्वाचे आहे. एक फलंदाज जो डावाला शेवटपर्यंत नेऊ शकतो, पण पुढच्या स्पर्धेत आम्हाला हे करावे लागेल आणखी चांगली कामगिरी करू, विशेषतः फलंदाजीत.”
सेमीफायनलचा दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध भारत या दोन संघांमध्ये रंगणार आहे. यामध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी लढणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यत विश्वचषकामध्ये एकही सामना गमावलेला नाही. तर भारताच्या संघानेही एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर कोणता संघ आव्हान उभे करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.