चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीवर दिगज्जांनी व्यक्त केले दुःख (फोटो सौजन्य - Instagram/X
बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पहिल्या आयपीएल विजयाच्या आनंद हा जास्त काळ टिकू शकला नाही. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. आरसीबी संघाने आयपीएल २०२५ ट्रॉफी उचलल्याच्या जल्लोषात चाहते सामील होण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बोरिंग हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ११ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाल्याची पुष्टी केली. त्यांनी मृतांच्या आश्रितांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई आणि सरकारकडून जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. या घटनेने माजी क्रिकेटपटूंनाही धक्का बसला आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. त्यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. काय म्हणाला सचिन जाणून घ्या (फोटो सौजन्य – Instagram/X.com)
सचिनने व्यक्त केली हळहळ
‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे घडले ते खूपच दुःखद आहे. प्रत्येक पीडित कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. मी सर्वांना शांती आणि शक्ती मिळावी अशी प्रार्थना करतो.”
RCB Vs PBKS : बेंगलुरु संघाच्या विजयानंतर इचलकरंजीत हुल्लडबाजी; पाेलिसांकडून साैम्य लाठीमार
सचिनची पोस्ट
What happened at Chinnaswamy Stadium, Bengaluru, is beyond tragic. My heart goes out to every affected family. Wishing peace and strength to all. 🙏
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 4, 2025
हरभजननेही व्यक्त केली दुःखद भावना
Heartbreaking news of a stampede outside the M. Chinnaswamy Stadium in Bengaluru, resulting in the tragic loss of lives and injuries to several cricket fans has cast a dark shadow over the spirit of the game that unites millions across our nation.
My deepest condolences go out…
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 4, 2025
त्याच वेळी, हरभजन सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची बातमी दुःखद आहे, ज्यामध्ये अनेक क्रिकेट चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेने आपल्या देशातील लाखो लोकांना एकत्र करणाऱ्या खेळाच्या भावनेवर काळी छाया पडली आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माझी मनापासून श्रद्धांजली आहे. या अविश्वसनीय कठीण काळात मी त्यांच्यासोबत एकता व्यक्त करतो आणि जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो.”
इरफान पठाणनेही केली पोस्ट शेअर
Fans are the heart of cricket and of our lives. The tragic loss of lives in today’s stampede in Bengaluru is deeply heartbreaking. My thoughts and heartfelt condolences are with the families affected by this unimaginable tragedy.
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 4, 2025
दुसरीकडे, इरफान पठाणनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले मन मोकळे केले आहे, इरफानने लिहिले आहे की, “चाहते हे क्रिकेटचे आणि आपल्या जीवनाचे हृदय आहेत. आज बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील दुर्दैवी मृत्यू हृदयद्रावक आहेत. या अकल्पनीय दुर्घटनेने प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत माझ्या भावना आहेत.”
शिखरलाही झाले दुःख
Absolutely heartbreaking to hear about the stampede at the victory parade in Bengaluru. Prayers for the families affected. Hope everyone stays safe. 🙏
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 4, 2025
याशिवाय, माजी भारतीय महान सलामीवीर धवनलाही या घटनेने खूप दुःख झाले आहे. धवनने लिहिले की, ‘बेंगळुरूमधील विजय परेडमध्ये चेंगराचेंगरीची बातमी ऐकून मन दुखावले. पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करतो. सर्वजण सुरक्षित राहतील अशी आशा आहे.’