बंगळुरू चेंगराचेंगरी(फोटो-सोशल मिडिया)
Bangalore stampede : काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिले आयपीएल विजेतपद आपल्या नावावर केले. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनी आनंद साजरा केला. यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच चाहत्यांचा उत्साहात वाढ झाली. आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी जमलेली गर्दी अनियंत्रित होऊन चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. आता यावरून राजकारण तापले आहे.
आता अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होऊ लागला ही की, या लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? आरसीबी व्यवस्थापन की कर्नाटक सरकार? मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांची जबाबदारी आता कोण घेणार? असे प्रश्न विचारले जात आहे.
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयी सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, “ही उत्साही तरुणांची गर्दी होती. त्यामुळे आम्हाला लाठीचा वापर करणे जमले नाही. गर्दी अनियंत्रित होती, पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे मिरवणूक थांबवावी लागली.”
आरसीबीच्या विजयी सोहळ्यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील एक्स वर लिहिले की “हे खराब नियोजन आणि व्यवस्थापनाचे परिणाम आहे. ही घटना राज्य सरकारच्या निष्काळजीपणाचे आणि गर्दी व्यवस्थापनाच्या अपयशाचे स्पष्टपणे प्रतिबिंबित करते. योग्य नियोजन आणि आपत्कालीन सेवांची तयारी न करता उत्सव साजरा करण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी होता. ही दुर्घटना टाळता आली असती. सरकार जबाबदार आहे आणि जबाबदारी निश्चित करायला हवी. ”
Seven people died in a stampede in Karnataka. It’s heartbreaking to see such loss because of poor planning and crowd mismanagement. The state government in Karnataka has clearly failed in its responsibility.
Celebrations is one thing, but the State government without proper…— Pralhad Joshi (@JoshiPralhad) June 4, 2025
एम. चिन्नास्वामी येथे झालेल्या सात जणांच्या मृत्यूवर आयपीएल अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा आयपीएलकडून आयोजित करण्यात आलेल नव्हता. त्यांनी सांगितले की हा आरसीबीचा खाजगी कार्यक्रम होता.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही चिंतेची बाब असून आमच्यासाठी एक मोठा धडा आहे. हा बीसीसीआयचा कार्यक्रम नव्हता तर आरसीबीच्या फ्रँचायझी कार्यक्रम होता. पण त्यांनी देखील असा विचार केला नव्हता की इतकी मोठी गर्दी जमेल. त्यांना वाटले असेल की हा कार्यक्रम वानखेडे स्टेडियममध्ये होईल असा होईल, पण प्रचंड गर्दी आली.”