RCB Vs LSG: Bangalore's Jitesh Sharma creates a sensation in IPL! He created history in IPL by surpassing MS Dhoni...
RCB Vs LSG : मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावा उभारल्या होत्या. प्रत्युउत्तरात बंगरूळुच्या जितेन शर्माने वादळी (३३ चेंडूत ८५ धावा) खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच विजय मिळवला आणि क्वालिफायर टॉप-२ मध्ये स्थान पटकावले आहे.
या सामन्यात जितेश शर्माने शानदार खेळ केला आहे आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवून आरसीबीला टॉप-२ मध्ये पोहचवले आहे. आरसीबीने हे स्थान त्याच्या वादळी खेळीमुळेच मिळू शकले आहे. इतकेच नाही तर त्याने एमएस धोनीला देखील आता मागे टाकले आहे.
हेही वाचा : RCB Vs LSG : Virat Kohli ला राग अनावर! Digvesh Rathi वर किंग कोहली भडकला, काचेवर बाटली मारली अन्.. पहा Video
आरसीबीने शेवटच्या म्हणजेच ७० व्या लीग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करत टॉप-२ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यासह, आरसीबी क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जशी दोन हात करणार आहे. या सामन्यात, आरसीबीचे नेतृत्व करणाऱ्या विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने एमएस धोनीला मागे टाकत एक इतिहास रचला आहे.
या सामन्यात जितेश शर्माने फलंदाजी करताना केवळ ३३ चेंडूत ८५ धावांची नाबाद खेळी साकाराली. ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटमधून ८ चौकार आणि ६ षटकार लगावले आहे. यासह जितेशने एक विशेष कामगिरी देखीलकरून दाखवली आहे.
हेही वाचा : RCB Vs LSG : संजीव गोयंका अखेर खुश! Rishabh Pant च्या शतकी खेळीसाठी लिहिला ‘तो’ एक शब्द, वाचा सविस्तर..
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सहाव्या किंवा खालच्या क्रमातील फलंदाजाने जितेशचा ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. यापूर्वी हा विक्रम चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर जमा होता. धोनीने २०१८ च्या आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध ३४ चेंडूत ७० धावा चोपल्या होत्या.
आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने एलएसजीवर शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने ३३ चेंडूत ८५ धावांची वादळी खेळी केली. तसेच विराट कोहलीने देखील ३० चेंडूत ५४ धावा केल्या. काल झालेल्या सामन्यात बंगरूळुच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे जितेन शर्मा. त्याच्या वादळी खेळीसमोर ऋषभ पंतचे(११८) शतक व्यर्थ गेले. या विजयासह बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-१ सामन्यात आरसीबीचा सामना पंजाब किंग्जशी होणार असून दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.