दिग्वेश राठीवर किंग कोहली भडकला(फोटो-सोशल मीडिया)
RCB Vs LSG : मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला गेला. आयपीएल 2025 च्या स्टेज लीगचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युउत्तरात बंगरूळुच्या जितेन शर्माने वादळी (३३ चेंडूत ८५ धावा) खेळीच्या जोरावर १९ व्या षटकातच विजय मिळवला आणि क्वालिफायर १ मध्ये स्थान पटकावले. तथापि, या सामन्यात विराट कोहली लखनौच्या गोलंदाज दिग्वेश राठीवर रागावल्याचे दिसून आला.
जितेश शर्माने आरसीबीसाठी तडाखेबंद खेळी केली. लखनौच्या गोलंदाजांनी त्याला बाद करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतरच तो शांत झाल्याचे दिसून आला. या सामन्या दरम्यान एलएसजीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या असा एक क्षण आला, जेव्हा दिग्वेश राठीने नॉन-स्ट्राइक एंडवर जितेशला देखील बाद केले, जे पाहून विराट कोहलीचा राग अनावर झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या तूफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : RCB Vs LSG : संजीव गोयंका अखेर खुश! Rishabh Pant च्या शतकी खेळीसाठी लिहिला ‘तो’ एक शब्द, वाचा सविस्तर..
लखनौविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्यात चांगली भागीदारी रचत होते. तर लखनौ मोठा स्कोअर उभारून देखील परभवाच्या छायेत वावरत होता. दरम्यान, दिग्वेश राठीने नॉन-स्ट्राइक एंडवर ‘मंकडिंग’ अंतर्गत जितेशला बाद करण्याचा प्रयत्न देखील केला. हे पाहून विराट रागावला आणि त्याने ड्रेसिंग रूममधील काचेवर बाटली मारली. हे सर्व व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) May 27, 2025
त्याच वेळी, जितेश शर्माच्या आउट किंवा नॉट आउटचा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवण्यात आला. जिथे पंचांना आढळून आले, की गोलंदाजाचा पाय पॉपिंग क्रीजच्या पलीकडे गेला होता, म्हणून त्यांनी नॉट आउट दिले. तर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने हे अपील मागे घेतले.
हेही वाचा : IPL 2025 : क्रिकेट जगतात Vaibhav Suryavanshi चा डंका! ५८ फलंदाजांना पिछाडीवर टाकून पटकावले पहिले स्थान..
लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने ३३ चेंडूत ८५ धावांची वादळी खेळी केली. तसेच विराट कोहलीने देखील ३० चेंडूत ५४ धावा केल्या. काल झालेल्या सामन्यात बंगरूळुच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे जितेन शर्मा. त्याच्या वादळी खेळीसमोर ऋषभ पंतचे(११८) शतक व्यर्थ गेले. या विजयासह बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-१ सामन्यात आरसीबीचा सामना पंजाब किंग्जशी होणार असून दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.