RCB Vs LSG: Virat Kohli's Bhima feat in T20 cricket! Kohli became the 'Four King', the first Indian to do so..
RCB Vs LSG : आयपीएल २०२५ मध्ये लीग स्टेजचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बंगरूळुने लखनऊला 6 विकेट्सने पराभुत केले. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावा केल्या. प्रत्युउत्तरात बंगरुळूच्या जितेन शर्माने तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय विराट कोहलीने देखील ३० चेंडूत ५४ धावा केल्या. या विजयासह बंगरुळू क्वालिफायर १ मध्ये पोहचला आहे. या दरम्यान विराट कोहलीने एक नवा विक्रम आपल्या नवे नोंदवला आहे. खरंतर, विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये १२०० चौकार मारणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहली असा पराक्रम करणारा पहिला आशियाई आणि एकूण चौथा फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला टी-२० मध्ये अशी कामगिरी केलेली नाही. विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५४ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने १० चौकार लगावले. यापूर्वी, एलएसजीविरुद्ध चौथा चौकार मारताच त्याने टी-२० मध्ये १२०० चौकारांचा टप्पा गाठला.
असा पराक्रम करणारा विराट पहिला आशियाई फलंदाज बनला आहे. विराट कोहलीपूर्वी, अॅलेक्स हे ल्स, डेव्हिड वॉर्नर आणि जेम्स विंग्स यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. परंतु टी-२० क्रिकेटमध्ये, विराट कोहलीशिवाय इतर आशियाई फलंदाजांना अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही. या सामन्याआधी कोहलीने ४११ टी-२० सामन्यांपैकी ३९४ डावात ११९५ चौकार ठोकले होते. पण आता तो टी-२० मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे.
लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने ३३ चेंडूत ८५ धावांची वादळी खेळी केली. तसेच विराट कोहलीने देखील ३० चेंडूत ५४ धावा केल्या. काल झालेल्या सामन्यात बंगरूळुच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे जितेन शर्मा. त्याच्या वादळी खेळीसमोर ऋषभ पंतचे(११८) शतक व्यर्थ गेले. या विजयासह बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-१ सामन्यात आरसीबीचा सामना पंजाब किंग्जशी होणार असून दुसरीकडे, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल.