अनुष्का शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : आयपीएल 2025 चा शेवटचा म्हणजे ७० वा साखळी सामना काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने बाजी मारली. बंगरूळुने लखनऊला 6 विकेट्सने पराभुत केले आहे. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने लढवय्या बाणा दाखवत विजय खेचून आणला. बंगरुळूच्या जितेन शर्माने तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि क्वालिफायर १ मध्ये प्रवेश निश्चित केला. या सामन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या प्रेमाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विराट आणि अनुष्का यांच्यातील फ्लाइंग किसचा रोमँटिक क्षण सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : Asian Athletics : स्पर्धेत भारताची पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी; Gulveer Singh ने केली सोनेरी कामगिरी…
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, विराट कोहली मैदानावर चालताच त्याची नजर स्टँडमध्ये बसून असलेल्या त्याच्या पत्नी अनुष्का शर्माकडे जाते. नेहमीप्रमाणे, यावेळीही विराटने आपले प्रेम व्यक्त करण्यास मागे पुढे बघितले नाही आणि त्याने अनुष्काला फ्लाइंग किस करत आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या. अनुष्का देखील हसून तिच्या पतीकडे फ्लाइंग किस पाठवताना दिसून आली. हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. चाहत्यांनी हा क्षण सोशल मीडियावर “रियल लव्हर्स” अशा कॅप्शनसह शेअर केला आहे.
Real Lover Boy! #virushka pic.twitter.com/e9eDSYHZrj
— TANYA SINGHANIA (@tanya_singhania) May 27, 2025
विराट कोहलीकडून नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. या निर्णयाने त्याचे चाहते भावूक झाले आहेत आणि अशा परिस्थितीत विराट-अनुष्काचा हा क्षण त्यांच्या हृदयावर फुंकर मारण्यासारखा होता. विराटच्या निवृत्तीनंतर अनुष्का शर्मानेही एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिने लिहिले होते की, “आपण बनवलेल्या विक्रमांबद्दल बोलू, पण तुम्ही कधीही दाखवलेले अश्रू मला आठवतील. कोणीही पाहिलेले नसलेले भांडण. तुम्ही नेहमीच तुमच्या मनाचे ऐकले आहे आणि या निरोपाचा प्रत्येक भाग मिळवला आहे.” असे अनुष्काने लिहिले होते.
हेही वाचा : LSG vs RCB : जितेश शर्माने खेळली मॅचविनिंग खेळी! LSG च्या संघाला RCB ने 6 विकेट्सने केले पराभूत
आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्मा(३३ चेंडूत ८५ धावा) आणि विराट कोहलीच्या (३० चेंडूत ५४ धावा) अर्धशतकांच्या जोरावर २३० धावांचे लक्ष्य १९ व्या षटकातच पूर्ण केले. या विजयासह बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला.