
RCB vs UPW LIVE SCORE: RCB restricted UP Warriors to 143 runs! Tight bowling from Clark and Patil.
RCB W vs UPW W: महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या यूपी वॉरियर्सने ५ गडी गामावत १४३ धावा केल्या आहेत. आता आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी १४४ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीच्या गोलंदाजांनी यूपी वॉरियर्स संघाला सुरुवातीपासूनच दबावात ठेवले. परिणामी, यूपी वॉरियर्सला धावांवर रोखण्यात यश आले.
हेही वाचा : कोणी केली ‘गब्बर’ ची शिकार? ‘हा’ क्रिकेटपटू पुन्हा चढणार बोहल्यावर! वाचा संपूर्ण प्रेमकहाणी
आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यूपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. यूपी वॉरियर्सची सुरुवात खूप वाईट झाली. त्यांचा पहिला गडी हरलीन देओलच्या(११ धावा) रूपात गेला. त्यानंतर मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी यूपीच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. यूपीचे पाच फलंदाज ५० धावांवरच माघारी गेले. मेग लॅनिंग १४ धावा, किरण नवगिरे ५ धावा, फोबी लिचफिल्ड २० धावा, श्वेता सेहरावत ० धावा करून हे फलंदाज बाद झाले.
संघाचे पाच फलंदाज माघारी गेल्यानंतर मात्र दीप्ती शर्मा आणि डिआंड्रा डॉटिन यांनी ९३ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. परंतु, त्यांना धावगती मात्र वाढवता आली नाही. दीप्ती शर्मा ३५ चेंडूत नाबाद ४५ तर डिआंड्रा डॉटिनने ३७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या आणि संघाला १४३ पर्यंत पोहचवले. आरसीबीकडून नादिन डी क्लार्क आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर लॉरेन बेलने एक विकेट घेतली.
Innings Break! A revival act by Deepti Sharma and Deandra Dottin after #RCB bowlers were on fire early on! 👌 Run chase coming 🆙 ⌛ Scorecard ▶️ https://t.co/U1cgf01ys0 #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvUPW pic.twitter.com/P3ppMlDPja — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 12, 2026
हेही वाचा : WPL 2026 : गुजरात जायंट्सला मोठा धक्का! ‘ही’ भारतीय स्टार खेळाडू या हंगामातून पडली बाहेर; काय आहे कारण?
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), डिआंड्रा डॉटिन, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना, शिखा पांडे, क्रांती गौड
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल