'Rohit-Kohli will not be seen in the 2027 World Cup', predicts former Indian player...
Rohit Sharma-Virat Kohli : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. तरुण शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची धुरा दिली आहे. याधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत, २०२७ पर्यंत या दोघांसाठीही एकदिवसीय विश्वचषक खेळणे कठीण असल्याचे दिसत आहे. अशातच माजी कर्णधार सौरव गांगुलीने या दोन दिग्गज खेळाडूंबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की, या दोघांसाठीही एकदिवसीय विश्वचषकात स्थान मिळवणे सोपे असणार नाही.
मीडिया एजन्सीशी बोलताना गांगुली म्हणाला की, “२०२७ पर्यंत तंदुरुस्त राहणे आणि भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळवणे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांसाठी सोपे असणार नाही. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येकाला एक ना एक दिवस खेळापासून दूर जावे लागणाराहे. हे लोकही दूर जाती.”
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंड संघासाठी खुशखबर! फलंदाजांना रडवणारा ‘हा’ वेगवान गोलंदाज संघात परतणार
आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये खेळला जाणारा आहे. तोपर्यंत कोहली ३८ वर्षांचा असणार आहे. तर रोहित ४० वर्षांचा असेल. तोपर्यंत भारत नऊ द्विपक्षीय मालिकांमध्ये २७ एकदिवसीय सामने खेळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात फक्त १५ सामने खेळायचे आहेत. गांगुली म्हणाला की “एका वर्षात फक्त १५ सामने. ते सोपे नसेल.”
हेही वाचा : IND Vs ENG : Rishabh Pant एक्सप्रेस सुसाट! विकेटमागे केला भीम पराक्रम, असे करणारा ठरला तिसरा भारतीय
कोहली आणि रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाही केली आहे. त्यानंतर त्यांनी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रोहित आणि कोहलीला काय सल्ला देऊ इच्छितो, असे गांगुलीला विचारले असता तो तेव्हा तो म्हणाला की, “मी कोणताही सल्ला देणार नाही. मला वाटते की ते त्यांचा खेळ खूप चांगले समजतात. याबाबत ते निर्णय घेतील.” गांगुली पुढे म्हणाला की कोहलीसारखा खेळाडू शोधणे सोपे असणार नाही. जरी या दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतर त्याला भारतीय क्रिकेटची चिंता वाटत नाही. विराट एक महान खेळाडू आहे. त्याचा पर्याय शोधण्यासाठी वेळ लागणार आहे. पण मला आश्चर्य वाटत नाही.