India Vs England 2nd ODI: दुसऱ्या वन-डे सामन्यात 'या' खेळाडूला मिळणार डच्चू; रोहित शर्मा मोठा निर्णय घेणार?
Rohit Sharma: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना भारताने जिंकला आहे. तर पहिल्या सामन्यात पदार्पण केलेल्या खेळाडू हर्षित राणाने कमाल गोलंदाजी केली. भारताचा दुसरा एकदिवसीय सामना आता कटक येथे होणार आहे. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात एका खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
भारत इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना 9 फेब्रुवारीला खेळणार आहे. मात्र या सामन्यातून एका युवा खेळाडूला बाहेर ठेवले जाऊ शकते. विराट कोहलीला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. त्यामुळे यशवी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना संधि मिळाली. हर्षित राणाने संधीचे सोने केले. मात्र यशस्वीला साजेशी खेळी करता आलेली नाही.
विराट कोहली या सामन्यात खेळणार असल्याने रोहित शर्मा यशस्वी जयस्वालला डच्चू देऊ शकतो. यशस्वीने पहिल्या सामन्यात केवळ 15 च धावा केल्या होत्या. यशस्वीला बाहेर ठेवले गेले तर उपकर्णधार शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करू शकतो. तर विराट तिसऱ्या स्थानी खेळू शकतो.
दुसरा सामना कुठे होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना खूप मदत करते. फिरत्या चेंडूंविरुद्ध फलंदाजांना धावा काढणे खूप कठीण असते. चेंडू बॅटवर अडकतो. फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांनाही सुरुवातीला विकेटवरून मदत मिळते. म्हणजेच कटकच्या या मैदानावर फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो.
जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
बाराबाटी स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण २७ एकदिवसीय सामने झाले आहेत. यापैकी ११ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याच वेळी, १६ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने मैदानात उतरले आहे. म्हणजे या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरते. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २२९ आहे. तर, दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या २०१ आहे. इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताने ५० षटकांत ३८१ धावा केल्या होत्या, जो या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. यासोबतच टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध १८९ धावांचा बचावही केला आहे.
हेही वाचा: IND vs ENG : फलंदाज वर्चस्व गाजवतील की गोलंदाजांची फिरकी चालणार? जाणून घ्या कसा असेल खेळपट्टीचा मूड
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेची सुरुवात दणदणीत विजयाने केली. नागपूरमध्ये, हर्षित राणाच्या धारदार गोलंदाजी आणि जडेजाच्या फिरकी गोलंदाजीसमोर ब्रिटीश संघ सहज बाद झाला आणि संपूर्ण संघ २४८ धावा करून सर्वबाद झाला. भारतीय संघाने २४९ धावांचे लक्ष्य केवळ ३८.४ षटकांत केवळ ६ गडी गमावून पूर्ण केले. फलंदाजीत, शुभमन गिलने संघाकडून ८७ धावांची शानदार खेळी केली, तर श्रेयस अय्यरने ५९ धावांचे योगदान दिले.