इंदौर : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघ टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) देखील यंदा टी २० विश्वचषक संघाचा एक महत्वाचा भाग आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू पर्थमध्ये ट्रेनिंग कॅपचा भाग बनले आहेत. दरम्यान, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्याचा आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला होता. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन विकेट्सवर २२७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र या सामन्यात भारतीय संघ ४९ धावांनी पराभूत झाला.
Bro ??
.@ImRo45 .@DineshKarthik pic.twitter.com/y6W1egfXjx— Manideep ? (@Manideep_Vanga) October 4, 2022
भारताच्या पराभवानंतर डगआउटमध्ये उपस्थित असलेला दिनेश कार्तिक टाळ्या वाजवू लागला. हे पहाताच रोहितने मस्करीत दिनेश कार्तिकच्या पाठीवर बुक्की मारली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघाने पहिले दोनही सामने जिंकल्यामुळे मालिकेत २-१ अशी आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला.