Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकासाठी रोहित शर्माची यशस्वी रणनीती, टीम इंडियासह विराट कोहलीलासुद्धा झाला फायदा, वाचा सविस्तर रिपोर्ट

विश्वचषक 2023 मध्ये भारताने अद्वितीय परफॉर्मन्स केल्याने भारत अव्वल स्थानावर कायम आहे. परंतु, यामागे रोहित शर्माच्या यशस्वी रणनीती महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक सामन्यात रोहित शर्माने दमदार सुरुवात करीत भारताला एक चांगली सुरुवात दिली आहे, हा त्याच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग असल्याने हे सर्व भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. ईडन गार्डनवर रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मान पाया रचल्यानंतर विराट कोहलीने कळस चढवला.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 06, 2023 | 07:55 PM
विश्वचषकासाठी रोहित शर्माची यशस्वी रणनीती, टीम इंडियासह विराट कोहलीलासुद्धा झाला फायदा, वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

Vikram Rathour On Rohit Sharma : विश्वचषकात (World Cup 2023) लागोपाठ आठ विजयाची नोंद करत टीम इंडिया (Team India) भन्नाट फॉर्मात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) धावांचा पाऊस पाडत आहे. कर्णधार रोहित शर्मा वादळी सुरुवात करीत आहे, तर विराट कोहली अखेरपर्यंत फलंदाजी करीत आहे. रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात पॉवरप्लेमध्ये चौकर आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे.

रोहित शर्माने संथ खेळपट्टीवर वेगाने धावा जमवल्या

कोलकात्यामध्येही (IND vs SA) रोहित शर्माने संथ खेळपट्टीवर वेगाने धावा जमवल्या. त्यामुळेच भारतीय संघाने तीनशे धावांचा पल्ला पार केला. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मान पाया रचल्यानंतर विराट कोहलीने कळस चढवला. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीवर आणि रणनीतीवर फलंदाजी कोच विक्रम राठौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय बॅटिंग कोच विक्रम राठौर काय म्हणाले?
फलंदाजी कोच विक्रम राठौर म्हणाले की, रोहित शर्मा भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व करत आहे. खासकरुन सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा देत असलेली सुरुवात कौतुकास्पद आहे. रोहितच्या आक्रमक फलंदाजीचा भारताला मोठा फायदा होतोय. रोहित शर्माला या विश्वचषकात फक्त एकदाच शतकाचा टप्पा ओलांडता आला. पण त्याने प्रत्येक सामन्यात वेगवान सुरुवात करून दिली आहे.

अशाप्रकारे खेळण्याची स्वतः रोहित शर्माची कल्पना

विक्रम राठौर म्हणाले की, अशाप्रकारे खेळण्याची कल्पना स्वतः रोहित शर्माची आहे. रोहित शर्मा स्वतः जबाबदारी घेऊन आक्रमक फलंदाजी करत आहे. रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळत आहे ते टीम इंडियासाठी फायद्याचे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माने लुंगी एनगिडी आणि मार्को यान्सन यांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दोन्ही गोलंदाज योग्य लाइन लेंथसाठी झगडत राहिले.
‘आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत’
विक्रम राठौर म्हणाले की, प्रत्येक सामन्यात आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. जितक्या धावा होतील तितक्या करायच्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सुरुवात धमाकेदार होतेय. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर वेळ घेऊन खेळू शकतात. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानाच्या खेळपट्टीवर केशव महाराज धोकादायक ठरू शकतो, याचा अंदाज आला होता. पण रोहित शर्माने संघाला ज्या प्रकारची सुरुवात करुन दिली त्यामुळे बाकीच्या फलंदाजांना वेळ काढून खेळण्याची संधी मिळाली. हा आमच्या रणनीतीचा भाग होता. त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.

Web Title: Rohit sharma successful strategy for world cup 2023 team india and virat kohli also benefited read detailed report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2023 | 07:52 PM

Topics:  

  • Eden Garden
  • ICC World Cup 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.