
Roshibina devi won silver in wushu
IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
अंतिम सामन्यात रोशिबिना आणि झांग शियाओयू यांच्यात खेळला गेला. हा सामना थरारक होईल अशी अपेक्षा होती. परंतु, चिनी खेळाडूने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली. झांगने पहिल्या फेरीत ५-० अशी आघाडी घेतली. तिने दुसऱ्या फेरीतही तीच कामगिरी कायम ठेवली. त्यामुळे, रोशिबिना ०-२ ने पारभव पत्कारावा लागला. झांगने एकूण १०-० गुणांसह सुवर्णपदकावर आफले नाव कोरले. तर,रोशिबिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नोरम रोशिबिना देवीने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकून एक अनोखी हॅट-ट्रिक साधली आहे. रोशिबिनाने जकार्ता-पालेमबांग येथे झालेल्या २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांडा ६० किलो गटात कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर तिने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि आता तिने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले आहे.
Another #AsianGames medal for Roshibina Devi! 🥈🇮🇳 The Indian wushu star takes silver in the women’s Sanda 60kg event at #AichiNagoya2026 to win silver at her third consecutive Asian Games. 2018🥉
2022🥈
2026🥈 pic.twitter.com/q4dPg5q41D — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 24, 2026
मणिपूरच्या या वुशू खेळाडूने २०१७ मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने २०१९ मध्ये दक्षिण आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने जागतिक वुशू चॅम्पियनशिपमध्येही भारताला गौरव मिळवून दिला आहे. इतकेच नाही, तर आशियाई खेळांमध्येही तिची कामगिरी प्रभावी आहे. या कामगिरीमुळे, रोशिबिना देवीला भारतातील क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च सन्मान असलेल्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. इतकेच नाही, तर २०२३ मध्ये, आयडब्ल्यूयूएफ (IWUF) द्वारे तिला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ म्हणून घोषित करण्यात आले.