
RSA vs UAE: Enrich Norcia creates history in T20 World Cup! He is the second fast bowler in the world to achieve 'Ha' Bheem' feat
Most wickets by fast bowlers in T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्वचषक २०२६ चा ३४ वा सामना युएईविरुद्ध ६ विकेट्सने आपल्या नावे केला. या सामन्यात एनरिच नोर्कियाने ४ षटकांत २८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यासह, नोर्किया टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला.
नोर्कियाने २०२१ पासून २० टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये ३७ विकेट्स टिपल्या आहेत. तर श्रीलंकेचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा ३१ सामन्यांमध्ये ३८ विकेट्स घेऊन अव्वल स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर ८ मध्ये तीन सामने खेळणार आहे. जिथे नोर्कियाला मलिंगाला पिछाडीवर टाकण्याची संधी असणार आहे.
टिम साउदी या वेगवान गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २५ सामन्यांमध्ये ३६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलने त्याच्या कारकिर्दीत २४ टी-२० विश्वचषक सामने खेळले असून त्याने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. किवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट १८ सामन्यांमध्ये ३४ विकेट्स घेऊन या यादीत पाचव्या स्थानावर विराजमान आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अलिशान शराफूने ३८ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह ४५ धावा केल्या, तर मोहम्मद अरफानने संघाच्या खात्यात ११ धावांची भर टाकली. याशिवाय इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर अँरिच नोर्कियाने २ बळी टिपले. जॉर्ज लिंडेनेही १ बळी घेतला.
दक्षिण आफ्रिका १३.२ षटकांत विजय साकार केला. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेने संघ १३.२ षटकांत विजय मिळवला. या डावात देवाल्ड ब्रेव्हिसने २५ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार एडेन मार्करामने २८ धावा फटकावल्या. रायन रिकेल्टनने संघाच्या खात्यात ३० धावा जोडल्या. युएईकडून हैदर अली, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद अरफान आणि मोहम्मद फारूक यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.