फोटो सौजन्य : JioHotstar
केशव महाराजच्या डोळ्यात अश्रु : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा विजेता काल जगाला मिळाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभुत करुन 27 वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावामध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे, त्यानंतर त्यांनी शेवटच्या चौथ्या इंनिगमध्ये खेळ सुधारुन संघाने विजय मिळवला. आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांना लागलेला टॅग हटवला आहे आणि संघाला विजय मिळवुन दिला आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज याचा आनंद अश्रुमध्ये पाहायला मिळाला. सामन्यानंतर माजी कर्णधार स्मिथशी भावनिक मुलाखतीत डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज आपले अश्रू रोखू शकले नाहीत. तो म्हणाला, “येथे आणि घरी असलेल्या प्रत्येकासाठी चषक उचलणे हे विशेष आहे, हा सन्मान आहे अशी भावना त्याने व्यक्त केली.
ICC च्या या महत्वाच्या नियमात होणार बदल! आता बाउंड्रीवर कॅच बेकायदेशीर मानले जाणार, वाचा सविस्तर
पुढे केशव महाराज म्हणाला की, सध्या आपल्याला काय वाटत आहे ते अश्रूंनी वर्णनही करता येणार नाही. हे देशाबद्दल आहे, गेल्या पाच दिवसांत प्रत्येकामध्ये एकता निर्माण झाली आहे. आम्ही येथील सर्वांचे खूप आभारी आहोत”. महाराज म्हणाले, “येथे आणि घरी असलेल्या प्रत्येकासाठी हे आमच्यासाठी खूप खास आहे. एक राष्ट्र म्हणून, एक संघ म्हणून आम्ही खूप आभारी आहोत.”
Keshav Maharaj , the only Indian-origin player to touch the WTC trophy.
His Interview with graham smith can make Even Adult Cry 🥲
Congratulations South Africa 🇿🇦 and Captain Temba For making this History.#WtcFinal2025#SouthAfrica pic.twitter.com/3aZYGK3AZl
— Devendra Soni (@DevendraSo37461) June 14, 2025
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 27 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि वर्षानुवर्षे चालत आलेला चोकरचा टॅग काढून टाकला. हा असा क्षण होता ज्याची दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट वर्षानुवर्षे वाट पाहत होते. आता अखेर तो क्षण आला आहे. संघाच्या विजयानंतर जेव्हा कॅमेरा लॉर्ड्स स्टेडियमवर उपस्थित असलेल्या डिव्हिलियर्स आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथकडे वळला तेव्हा दोघेही त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवताना दिसले. दक्षिण आफ्रिकेच्या या दोन महान खेळाडूंनी असा क्षण कधीच अनुभवला नव्हता.