
SA vs CAN, T20 World Cup 2026: South Africa sets a massive target of 214 runs against newcomers Canada! Markram and Stubbs shine.
SA vs CAN, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील ९ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा आमनेसामने उभे ठाकले आहेत. या सामन्यात टॉस गामवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना एडन मार्करामच्या अर्धशतकाच्या जोरावर कॅनडाविरुद्ध ४ विकेट गमावून २१३ धावा उभ्या केल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर, कॅनडाच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवून कॅनडासमोर आता जिंकण्यासाठी २१४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे, जे कॅनडा संघासाठी हे लक्ष्य साध्य करणे सोपे असणार नाही.
हेही वाचा : BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करामने कप्तानी पारी खेळली. त्याने ३२ चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी खेळली. या डावात मार्करामने १० चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्या खेळीने संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्याने सुरुवातीपासूनच कॅनडाच्या गोलंदाजीवर चांगलेच आक्रमन चढवले.
कर्णधार मार्कराम व्यतिरिक्त, इतर फलंदाजांनी देखील महत्त्वपूर्ण खेळीने संघाची धावसंख्या पुढे नेली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रायन रिकेल्टनने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा करत संघाच्या डावाला आकार दिला. तसेच डेव्हिड मिलरने २३ चेंडूत ३९ धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. ज्यामध्ये एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ट्रिस्टन स्टब्सने जोरदार फटकेबाजी करत १९ चेंडूत ३४ धावा करत संघाला २०० धावांच्या पार घेऊन गेला.कॅनडाकडून अंश पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर कर्णधार दिलप्रीत बाजवाने १ विकेट घेतली.
२१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, कॅनडा आता फलंदाजीला मैदानात उतरला आहे. इतके मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी, संघाला मजबूत सुरुवात आणि सातत्यपूर्ण भागीदारी करणे आवश्यक असणार आहे.
कॅनडा प्लेइंग इलेव्हन: युवराज समरा, दिलप्रीत बाजवा (कर्णधार), नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (डब्ल्यू), हर्ष ठाकरे, साद बिन जफर, जसकरण सिंग, दिलोन हेलिगर, कलीम सना, अंश पटेल
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी