पीसीबी आणि बीसीबीच्या ICC समोर नको त्या अटी(फोटो-सोशल मीडिया)
PCB and BCB’s conditions before the ICC : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मागण्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. आता, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मांडण्यात आली आहे. जी पहिल्या दृष्टीक्षेपात २०३१ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-यजमानपद भारताच्या शक्यतेला कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. २०३१ चा विश्वचषक भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे आयोजित करणार असून पीसीबी आणि बीसीबी यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की, विद्यमान हायब्रिड मॉडेल पुढील आवृत्तीपर्यंत वाढवण्यात यावे, जेणेकरून भारताचे अधिका अधिक आर्थिक नुकसान होईल. असा विचार दिसत आहे.
हेही वाचा : ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल
सध्या, हायब्रिड मॉडेल २०२७ पर्यंत लागू असून या अंतर्गत, बांगलादेश आणि पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने भारताऐवजी बांगलादेशमध्ये खेळू शकतील. एका वृत्तानुसार, रविवारी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीने पीसीबी आणि बीसीबीसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरील बहिष्कारावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. बीसीबीचे प्रतिनिधित्व अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांच्याकडून करण्यात आले, तर पीसीबीचे प्रतिनिधित्व मोहसिन नक्वी यांनी केले. तसेच यावेळी आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा देखील उपस्थित होते.
वृत्तांनुसार, ही बैठक सुमारे चार तासांपेक्षा जास्त चालली, परंतु यामध्ये कोणतीही संयुक्त घोषणा करण्यात आलेली नाही. पीसीबी सूत्रांनुसार, दोन्ही बाजू पाकिस्तान सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच त्यांचा निर्णय जाहीर कण्यात येणार आहे.
हेही वाचा : ‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video
T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…
T20 World Cup 2026, India-Pakistan, India vs Pakistan, Bangladesh Cricket Board, Imran Khwaja, ICC, PCB, Marathi Sports News, Pakistan Cricket Board, Bangladesh Cricket Board, ICC,टी२० विश्वचषक २०२६, भारत-पाकिस्तान, भारत विरुद्ध पाकिस्तान, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, इम्रान ख्वाजा, आयसीसी, पीसीबी, मराठी क्रीडा बातम्या, पाकिस्तान क्रिकेट बोर्, बांगलादेश क्रिकेट बोर्ड, आयसीसी






