
'Promises have to be kept, but...' Sachin Tendulkar remembers former Indian player Gursharan Singh's performance
Gursharan Singh praised by Sachin Tendulkar : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे स्मरण करण्यात आले. सिंग हाताला फॅक्चर असून देखील १९८९-९० च्या इराणी कप सामन्यात दिल्लीविरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाकडून ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. जेणेकरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याचे शतक पूर्ण करू शकेल.
हेही वाचा : IND vs SA 1st T20 : ‘यॉर्कर किंग’चा जागतिक क्रिकेटमध्ये कहर! ‘ही’ कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीकडून रेस्ट ऑफ इंडियाचा ३०९ धावांनी पराभव करण्यात आला होता. या सामन्यात फक्त सचिन तेंडुलकर संघासाठी चांगली फलंदाजी करू शकला होता. तेंडुलकरने नाबाद १०३ धावा फटकावल्या होत्या. तर भारताचा माजी सलामीवीर डब्ल्यूव्ही रमन ४१ धावांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. ५५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रेस्ट ऑफ इंडियाने २०९ धावांवर नऊ विकेट गमावल्या. त्यानंतर भारत, दिल्ली आणि पंजाबचा माजी खेळाडू गुरशरण हाताला फॅक्चर असूनही ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तेंडुलकरला पाठिंबा दिला. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. तेंडुलकरच्या शतकानंतर गुरशरण निवृत्त झाला. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर मर्यादित राहिला.
एजस फेडरल लाईफ इन्शुरन्सने येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर म्हणाला, “जसे ते म्हणतात, आश्वासने पाळायची असतात. मला वाटते की मी एक पाऊल पुढे जाऊन असे म्हणेन की आश्वासने पाळायची असतात, पण ती पूर्णही करावी लागतात… आणि तीच आमची डीएनए आहे. मला एक घटना आठवते. खूप वर्षांपूर्वी, १९८९ मध्ये, जेव्हा मी इराणी ट्रॉफीमध्ये खेळत होतो. भारतासाठी निवड होण्यापूर्वी तो एका चाचणी सामन्यासारखा होता. मी ९० च्या आसपास फलंदाजी करत होतो आणि माझा साथीदार गुरशरण सिंग जखमी झाला. त्याच्या हातात फॅक्चर झाले होते आणि तो फलंदाजी करू शकत नव्हता. तथापि, निवड समितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी त्याला बाहेर जाऊन फलंदाजी करण्यास आणि त्याच्या साथीदाराला (तेंडुलकर) पाठिंबा देण्यास सांगितले.”
हेही वाचा : Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज