Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 08:42 PM
तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण (photo Credit - X)

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण (photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे!
  • अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदींची भेट
  • दिलं निमंत्रण
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या घरात लवकरच लग्नाची लगबग सुरू होणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, या शाही विवाहात देशातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तेंडुलकर कुटुंब

सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि कुटुंबातील सदस्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सचिनने अर्जुन आणि त्याची भावी पत्नी सानिया चांडोक यांच्या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधानांना दिले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सचिनने लिहिले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभासाठी आमंत्रित करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. या तरुण जोडप्याला दिलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शनाबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक आभार.”

We were honoured to invite Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you, Modi ji, for your blessings and thoughtful advice for the young couple. pic.twitter.com/7oxOZm3i5X — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2026

केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण

We cordially invited Hon’ble Home Minister Shri @AmitShah ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you for the warmth extended to our family, we deeply appreciate your kind wishes. pic.twitter.com/IfcNIms6qK — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2026

Sania Chandok Photos : अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? जाणून घ्या माहिती..

सोनिया गांधी यांचीही घेतली भेट

केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे, तर सचिनने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही १०, जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंजली तेंडुलकरही सोबत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनने सोनिया गांधींनाही लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

कधी आहे लग्न?

वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये लग्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना उपस्थित राहून एक गुप्त साखरपुडा समारंभ पार पडला. वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात, ३ मार्च रोजी विधी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि लग्न समारंभ ५ मार्च २०२६ रोजी होण्याची अपेक्षा आहे. हे समारंभ मुंबईत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात, स्वतः सचिन तेंडुलकरने अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

कोण आहे सानिया चांडोक?

अर्जुन तेंडुलकरसोबत साखरपुडा झालेली सानिया चांडोक ही मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आहे. या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम कंपनी आहे. अर्जुनची भावी पत्नी असणारी सानिया चांडोक याआधी देखील अनेकदा अर्जुन आणि त्याची बहीण सारा तेंडुलकरसोबत दिसूनआलिया आहे. सानियाला WVS कडून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तिने त्यांचा ABC कार्यक्रम पूर्ण केला असून ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक असल्याची माहिती मिळत आहे. सानिया फारशी सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहत नाही. तिच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Arjun-Sania Engagement : ‘हो, तो साखरपुडा झालाय’, अखेर सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या नात्याला दुजोरा.. 

Web Title: Sachin tendulkar meets pm modi shah for arjuns wedding invites them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Arjun Tendulkar
  • PM Narendra Modi
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास
1

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष
2

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार
3

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार

‘व्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर! पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय
4

‘व्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर! पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.