
Asian Games 2026
जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. निशियो जिमनॅजियममध्ये झालेल्या या लढतीत साक्षीने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियंत्रित बॉक्सिंगचे प्रदर्शन केले. तिने अचूक पंच लगावत विलेगासवर दबाव कायम ठेवला. प्रतिस्पर्धी बॉक्सरला आपल्या खेळाची लय सापडू न देता साक्षीने तिन्ही राउंडवर वर्चस्व राखले.
MARCHING INTO THE NEXT ROUND! 🔥 Sakshi Choudhary puts on a composed display to secure a unanimous 5-0 victory in the Women’s 51kg category and book her place in the next round! 🥊 Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/nypQfiCSxx — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 22, 2026
साक्षीने सामन्यातील तिन्ही राउंड 10-9 अशा गुणांनी आपल्या नावे केले. तिच्या वेगवान हालचाली, अचूक पंच आणि बचावात्मक खेळामुळे विलेगासला आक्रमणाच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. अखेर तिन्ही जजनी साक्षीच्या बाजूने कौल दिला आणि तिने 5-0 अशा एकतर्फी पॉईंट्सने सामना जिंकला आहे. साक्षीसमोर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या अनुभवी आयरा विलेगासचे आव्हान होते. मात्र, मोठ्या व्यासपीठावरील दबाव झुगारून साक्षीने आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.
कॉमनवेल्थ गेम्सनंतर साक्षीने एशियन गेम्समध्येही आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तिने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती फिलीपिन्सची आयरा विलेगास हिचा 5-0 असा पराभव केला. निशियो जिमनॅॅजियममध्ये झालेल्या या सामन्यात साक्षीने तिन्ही राउंडमध्ये 10-9 अशी आघाडी घेतली. अचूक पंच आणि नियंत्रित आक्रमक खेळाच्या जोरावर तिने विलेगासला फारशा संधी दिल्या नाहीत. या विजयासह साक्षीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.